लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण कायमस्वरूपी न हटविल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार
किनवट ता.प्रतिनिधी: किनवट शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण कायमस्वरूपी न हटविल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार किनवट,सहाय्यक जिल्हाधिकारी, नगरपालिका किनवटव पोलीस स्टेशन किनवट यांना देण्यात आले.
किनवट शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यालगत मागील कित्येक महिन्यापासून व्यवसायिक लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून दिवस-रात्र पुतळ्याच्या आजूबाजूला ट्रक टेम्पो मोटरसायकल कार अशी वाहने लावली जात असल्याने पुतळा पूर्णपणे झाकला जात आहे. काही व्यवसायिक तर पुतळ्याच्या सभोवताली दिवसभर उभे असलेल्या वाहनामुळे पुतळ्याची विटंबना होत असून या अतिक्रमण संदर्भात मातंग समाजाच्या वतीने यापूर्वी अनेकदा लेखी निवेदन सादर करून सुद्धा प्रशासन दखल घेण्यास तयार नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या भुतांच्या अतिक्रमणामुळे मातंग समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसराची दुरावस्था झाली आहे वाहनाच्या व छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणामुळे समाज बांधवांना पुतळ्याजवळ जयंती सारखी कार्यक्रम घेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. पुतळा अतिक्रमण कायमस्वरूपी काढावी अशी समस्त मातंग समाजाची मागणी आहे. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील पूर्ण अतिक्रमण काढून संपूर्ण परिसराचे तारपुणपण करून द्यावे. पुढील आठदिवसात आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आठ दिवसानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.