वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज: डॉ कुळकर्णी.
ता.प्रतिनिधी: 21व्या डिजिटल युगामध्ये वाचन हे सातत मोबाईलच्या वापरामुळे कमी होत असून मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचनाची आवड निर्माण करून देणे ही काळाची गरज असून त्यासाठी अण्णाभाऊ साठे ग्रंथालय तर्फे विविध प्रकारचे वाचनीय उपक्रम स्तुत्य असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय अग्रेसर असल्याचे प्रतिपादन डॉ.दिवाकर कुलकर्णी यांनी केले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय तर्फे बाल किशोर कोपरा या उपक्रमाचे उद्घाटन कांतीगुरु लहूजी साळवे आरोग्य केंद्राचे संचालक डॉ दिवाकर कुलकर्णी , यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या उपक्रमाचे उद्घाटन श्री अमित गोरखे प्रदेश सचिव भाजपा,(पुणे )प्रा. संजय गायकवाड उपाध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक, साहित्यिक कवी धनंजय गव्हाले संचालक प्रा अनिल साबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन साबळे यांनी केले, यावेळी भगवान राऊत, विश्वजीत साबळे, यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ दिवाकर कुलकर्णी , उद्घाटक अमित गोरखे प्रा संजय गायकवाड हे कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते.