किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण व केंद्र संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मथुरानगर किनवट येथे संपन्न

किनवट/ प्रतिनिधी: दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मथुरा नगर येथे शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षणाचे आयोजन केंद्र नया कॅम्प किनवट तसेच केंद्र संमेलनाचे हे आयोजन करण्यात आली होते.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून नया कॅम्प केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आर. टी. राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळा गोकुंदा येथील मुख्यध्यापक व ज्येष्ठ पत्रकार आनंद भालेराव हे उपस्थित होते.
प्रथमतः माता सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तसेच केंद्र नया कॅम्प अंतर्गत सर्व (मु.अ.)व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या श्रीमती उबाळे आर. के. व श्रीमती कटीकवार मॅडम यांनी सुलभक म्हणून प्रशिक्षण दिले.
त्यात त्यांनी प्रास्ताविक व शाळा पूर्वतयारी संबंधित सर्व घटकावर प्रकाश टाकला आणि प्रत्यक्ष मेळाव्यात प्रात्यक्षिक करून घेतले.
केंद्रप्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला व अल्पवहाराने कार्यक्रमाची सांगता झाली .

या केंद्र संमेलनाचे सूत्रसंचालन श्रीमती उबाळे आर.के. यांनी केले विशेष बाब म्हणजे मागील मेळाव्याचे अनुभव कथन व प्राथमिक शाळा बेलोरी चे (मू.अ.) सुदेगोणेवार यांनी गीत सादर केले.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण पार पडले व श्री उत्तरवार ये.टी. (मु अ )तसेच श्रीमती उबाळे आर.के.(सहशिक्षक) यांच्या अथक प्रयत्नाने व परिश्रमाने प्रशिक्षण शंभर टक्के यशस्वी झाले.

215 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.