जि प टेकामांडवा शाळेत पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात शिक्षक-पालक सभा संपन्न
जिवती/ प्रतिनिधी: आज जि प उच्च प्राथ केंद्र शाळा टेकामांडवा, पं स जिवती येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शाळेतील पालकांचा उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळाला ।गावातील 70 पालकांपेक्षाही जास्त पालक सदरील पालक सभेला उपस्थित होते।
महिलांचाही प्रतिसाद उत्तम होता। या पालक सभेमध्ये शाळेच्या गुणवत्तेबद्दल, विद्यार्थ्यांची शिस्त, विविध उपक्रम, मिशन गरुडझेप, शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य, पालकांची भूमिका, मॅजिक बस चे कार्य, वाचनालय, शालेय भौतिक सोयीसुविधा व विशेष करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल उत्साहाने चर्चा करण्यात आली ।
पालकांनीही आपली भूमिका मांडली ।तसेच शिक्षकांनी पालकांच्या जबाबदाऱ्या, अपेक्षा तसेच पालकांनी शिक्षकांकडून काय अपेक्षा आहेत यावर सुद्धा या पालक सभेमध्ये चर्चा करण्यात आली।अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सकाळी 8.30 ते 11.00 या वेळेमध्ये सुंदरपणे पालक सभा पार पाडली।येत्या काळात तालुक्यातील आदर्श शाळा बनवण्यासाठी शिक्षक व पालक दोघांनीही कंबर कसली आहे। असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही ।एकंदरीत टेकामांडवा शाळेतील आजची पालक सभा विद्यार्थी, पालक, व शिक्षक या सर्वांमध्ये नवचेतना निर्माण करणारी व भविष्यात आदर्श मॉडेल तयार करणारी ठरली।