!! एक वेदना माझ्या बळीराजाची!!
!! एक वेदना माझ्या बळीराजाची!!
नको नको रे अवकाळी पावसा
येऊस अवचित तू…
हातात तोंडाशी आलेला घास कारे हिरावशी तू..
मोडून पडले काढलेले पिक गरिबांनी आता कुठे मागावी भिक?
देणारच तू नशिबावर रुसलाय
फाटक्या कापडाची जीरण भोक..
बघून काळ आम्हावर हसला
कसे स्वप्न टाकली पिका नगद
बरसली म्हाताऱ्या बापाची आसव
मात्र सर्वस्वी डोळ्यातच..
एकटच आभाळाकडे बघून नजर ही फासली..
गारपीटीच्या तडक्याने उसवली काळजाची शिवण..
कुठे कुण्या वाटे जावे नाही ठाव काहीं ठिकाणा..
उभ्या पिकातलं पाणी बघून रोज एक नवी वेदना..
बळीराजाच्या नेहमीच माथी या अवकाळी चा ठपका..
दिसायला उरलाय फक्त काही एकराचाच भपका..
खरी वेदना सांगा या कुणा घेतला शब्दांनीच हो धसस्का..
तुलाच जर नाही कळली व्यथा
तर मांडू कुणाजवळ कथा..
आता समाजात या चालली न्यारीच प्रथा
बाजारात पिकांना नाही हमीभाव काढणीला आल्यावर काळजावर घाव…
✍️ सुहास दत्ता गायकवाड ( घोटिकर)..
मो: ९५२९२३०६११.