किनवटला जिल्ह्याचा दर्जा देऊन मांडवी, बोधडी आणि इस्लापूरला तालुके करण्याच्या मागणीसाठी किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने सर्व पक्षी धरणे आंदोलन संपन्न
KTN महाराष्ट्र NEWS| नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून किनवटला जिल्ह्याचा दर्जा सह मांडवी, बोधडी आणि इस्लापूर तालुक्याच्या निर्मितीसाठी 17 मार्च रोजी जिजामाता चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने पार पडले.
सदरील धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष नामदेवराव केशव हे होते. धरणे आंदोलनानंतर धरणे आंदोलनकर्त्यांनी किनवट किनवट जिल्हा झाला पाहिजे व मांडवी इस्लामपूर व बोधडी तालुके झाले पाहिजे अशा घोषणा दिल्या त्यानंतर सर्वपक्षीय शिष्ट मंडळ तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांना भेटून किनवट जिल्हा सह बोधडी इस्लापूर व मांडवी तालुके झाले पाहिजे याबद्दल निवेदन दिले यावर तहसीलदारांनी आम्ही शासनास कळवू असे आश्वासित केले धरण आंदोलना संदर्भात अनेक मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोळंके पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व आभार नारायणराव सिडाम यांनी केले.
माजी आमदार प्रदीप नाईक, नामदेवराव केशवे,नारायणराव सिडाम, व्यंकटराव नेमानिवर, गंगारेड्डी बैनमवार,प्रफुल राठोड ,नवीन राठोड, प्रकाश गब्बर राठोड, नवीन राठोड राजगड, अभय महाजन, सोपानराव केंद्रे, , एस अहमद अली, आनंद भालेराव ,संतोष अडकीने ,सुभाषबाबू नायक, नाना भालेराव, धनलाल पवार, कुंदन पवार राजेंद्र केशवे, अमोल केशवे, शिवसेनेचे सुरत सातुरवार ,साजिद खान, संध्याताई राठोड, विनोद भरणे, गिरीश नेमानिवार, स.अन्वर, जनाबाई डुडुळे, जहीर खान वैजनाथ करपुडे पाटील, पत्रकार गोकुळ भवरे, प्रदीप वाकोडीकर,किशन भोयर, दत्ता जायभाये, अनिल भंडारे,दुर्गादास राठोड, सुरेश मस्के, बी एल कागणे, डॉक्टर अशोक बेलखोडे, मुसाखान, त्रिभुवन सिंग ठाकूर, लक्ष्मीपती दोनपेलीवार आदी उपस्थित होते.