पुरोगामी कुणबी मराठा महासंघ, महाराष्ट्र चा कोळी महादेव समाजाच्या आंदोलनास पाठिंबा | 8 दिवसापासून महिला व पुरुष भर उन्हात सत्याग्रह
किनवट/प्रतिनिधी: गेल्या आठ दिवसापासून कोळी समाजाचे चालू असलेले धरणे आंदोलन आपल्या परीने शासनाची परवानगी घेऊन न्याय देण्यात यावा. अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना पुरोगामी कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांनी दिले आहे .
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, 8 दिवसापासून महिला व पुरुष भर उन्हात सत्याग्रह करीत आहेत. बाकी सर्व ठिकाणी या समाजास न्याय मिळतो की नाही याची खात्री करा व शासनाच्या आदेशाप्रमाणे या समाजास आपल्या बाजूने न्याय मिळावा. जातीचे प्रमाणपत्र नियमाप्रमाणे व्हॅलिडीटी झाल्याचे ,रक्ताचे नाते असलेले व मागणाऱ्या चे पुरावे असल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळण्यास वेळ जाऊ नये. ही माझ्या समाजाच्या वतीने विनंती करतो.
असे अनेक समाज छोटे आहेत ते संघटित नाहीत व गरिबीमुळे मंत्रालय गाठू शकत नाही अशांना न्याय मिळावा म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयाशिवाय पर्याय नाही. म्हणून या समाजाचे दुःख समजून घायवे.सध्या विधानसभा चालू आहे तरी सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने आमची विनंती महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवावी. कोळी समाजाच्या योग्य तो न्याय द्यावा मी सुद्धा माझ्या समाजाच्या वतीने पाठिंबा देत आहे. तसेच निवेदनाची दखल घेऊन आपल्या अधिकारानुसार काही प्रमाणपत्र देण्यासारखे असतील ते देण्याची कृपा करावी आणि उन्हातान्हात तळपत बसलेल्या समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर श्री नामदेवराव ग्यानबाजी पेशवे उपाध्यक्ष पुरोगामी कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य व श्री व्यंकटराव नेम्मानिवार शहराध्यक्ष काँग्रेस किनवट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.