जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्माबाद शाखेकडून ६ कोटी २५ लाख रुपयांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वाटप
*धर्माबाद : ता.प्रतिनिधी:साजिद भाई*
अतिवृष्टी व पुर परिस्थितीमूळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्माबाद शाखेने आजपर्यंत ६ कोटी २५ लाख ४५ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे अशी माहीती शाखाधिकारी जी.डी.कदम यांनी दिली आहे.
खरीप हंगामात नांदेड जिल्हयात अतिवृष्टी व पुर परिस्थितीमूळे बळीराजांचे मोठया प्रमाणात पीकहानी झाली नव्हे डोळयासमोर पीक वाहुन;कुजून गेले होते.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यसाठी राज्यशासनाने नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर जिरायती पिकांना १० हजार,बागायती पिकांसाठी १५ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले.
धर्माबाद तालुक्यासाठी पंचनाम्याच्या आधारे एकूण ४१ गावातील १८१४२ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ८५ लाख रुपये मदत निधी मंजूर झाला आहे.त्यापैकी पहिला हप्ता (७५%) वितरित करणे सूरु असून ८८८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ कोटी २५ लाख ४५ रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्माबाद शाखेने विक्रमी कामगिरी केलेली आहे.धर्माबाद शाखेने नांदेड जिल्हयातील उमरी नंतर दुसऱ्या क्रमांकाची निधी वाटप केलेले आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आपला पैसा सहजपणे काढता यावा यासाठी २३०० एटीएम कार्ड वितरीत करून शेतकर् यांच्या डायरेक्टर खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आले आहेत.
–
*जी.डी.कदम*
*शाखाधिकारी,*
*नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक,धर्माबाद*