प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,निष्काम सेवाभावी संस्था,राहूल गांधी विचार मंच व जिल्हा कमेटीच्या वतीने जागतिक महीलादिना निमित्त मोफत महीला आरोग्य शिबीर संपन्न
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि15.जिल्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व निष्काम सेवा संघ तसेच काॅंग्रेस समर्थक संघटन राहूल गांधी विचार मंचच्या नांदेड शहर व जिल्हा कमेटी वतीने जागतिक महीलादिना निमित्त मोफत महीला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाश कौर खालसा माजी सभापती व डाॅ. आरशिया कौसर माजी सभापती ना.म.पा.याच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.चंदा रावळकर मॅडम जिल्हा समन्वयक नेहरू युवा केंद्र ह्या होत्या व प्रमुख उपस्थितीत धीरज यादव नगरसेवक प्र.इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहरजिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस नांदेड व राष्ट्रीय प्रभारी राहूल गांधी विचार मंच भारत ,संजीवकुमार गायकवाड प्रदेश अध्यक्ष राहूल गांधी विचार मंच महाराष्ट्र,डाॅ.शुभांगीताई देवससरकर शहराध्यक्षा डाॅक्टर सेल काँग्रेस नांदेड,डाॅ.अर्चना बजाज ज्येष्ठ समाज सेविका, डाॅ.परमवीर सिंघ मेडीकल ऑफीसर दशमेश हाॅस्पीटल या मान्यवराच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिबीराचे आयोजक संजीवकुमार गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संघटनेचे नांदेडचे सर्व पदाधिकारी व राजकमल सिंघ गाडिवाले शहरजिल्हाध्यक्ष राहूल गांधी विचार मंच या संघटनेचे नांदेडचे सर्व पदाधिकारी व निष्काम सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन दशमेश हाॅस्पीटल येथे करण्यात आले.
यावेळी आयोजका कडून उपस्थित मान्यवराचे शाल व हार टाकून यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
या शिबिरात एकुण 120 महीलांचे
आरोग्य तपासणी करण्यात आली असून यात
kft टेस्ट,Lft टेस्ट,थाॅयराईड टेस्ट,cbc लिक्विड प्रोफाईल टेस्ट इत्यादी तपासण्या व औषधी देण्यात आले आहेत.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा संचखंड बोर्ड व डाॅ.अर्चना बजाज,डाॅ.सुजाता राठोड, डाॅ.शिवकाशी धर्मले, डाॅ.विखारुनिसा खान,डाॅ.शुभांगी देवससरकर,डाॅ.आरशिया कौसर,सदाशिव सुवर्णकार समुपदेशक,प्रियंका झगडे व भाग्यश्री गायकवाड अधिपरिचारिका,एम.एम.सुरणार प्रयोग शाळा तंत्रज्ञ या सर्वाच्या मदतीने संपन्न झाले
यावेळी आयोजकाच्या वतीने राजकमल सिंघ गाडिवाले यांनी माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव नागेलीकर,राहूल गांधी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक कोचे साहेब,राष्ट्रीय अध्यक्ष संजीव सिंह परिहार सर, इजि.हरजिंदर सिंघ संधू शहरजिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस नांदेड व राष्ट्रीय प्रभारी राहूल गांधी विचार मंच इंडिया,प्रदेश अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड,गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डाॅ.पसरिचा साहेब,डाॅक्टर,नर्सिंग स्टाफ,कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट, श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रूग्णालय,प्रतिष्ठित नागरिक दिपक सिंघ गल्लीवाले,नारायण सिघ वासरिकर,सुरजित सिंघ तबेलेवाले,लालसिंघ कॅशियर,दिपसिघ गाडिवाले,राजींदरसिंघ,आहदखान,
सुहास देशमुख,डाॅ.रायेवार,पत्रकार बांधव व उपस्थितांचे आभार मानले आहेत.
या शिबिरास लाभार्थ्यांकडुन व उपस्थित मान्यवराच्या वतीने आयोजकाचे कौतुक करण्यात आले आहे.