किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट तालुक्यातील काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात “हात से हात जोडो” अभियानाची सुरुवात

किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी काँग्रेस किनवट पक्ष कार्यालयात “हात से हात जोडो” अभियानाची सुरुवात तालुका अध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी ता.अध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी म्हणाले की,देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकरभरती, खाद्यतेल, इंधनाचे वाढलेले भरमसाठभाव आणि महिला, दलित, अल्पसंख्याक होणारे अन्याय अत्याचार, हल्ले, धार्मिक, जातीय ताणतणाव गेल्या ८-९ वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यासाठी केंद्रातील व महाराष्ट्रतील ह्या हुकुमशाही सरकार विरोधात सर्वानी एकत्रित येण्यासाठी हे “हाथ से हाथ जोड़ो” अभियान राबविण्यात येत आहे व यातून देशातील व राज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेला संघटित करून ह्या जुलमी व हुकुमशाही सरकार विरोधात बुलंद आवाज उठवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रसंगी के.सूर्यकांत रेड्डी, वेंकटराव नेमानिवार, शेख शेहनाज, यादव यादव, के मूर्ती, गिरीश नेमानिवर,समशेर खिच्ची,सुभाष बाबू नायक,आनंद भालेराव,शेख परवीन, ईश्वर चव्हाण, माधव खेडकर, जवाद आलम, रमेश राऊलवार,राहूल चौदंते,नवीन जाधव,प्रीती मुनेश्वर,जयश्री भरणे,निर्मला कुमरे, संतोष अडकीने, लक्ष्मीपती दोनपल्लीवर,शदुल्ला भाई,अन्वर सय्यद,बिलाल बडगुजर,वसंत राठोड,नारायण दराडे,गजानन जाधव,मंगेश राठोड,सुभाष बाभूळकर फारूक बाबा, डॉ,तौफिक खान आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

50 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.