अंबुलगेकर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सोबतच ; पुजरवाड यांचीही काँग्रेस पक्षात एंट्री
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.४.गेली अनेक वर्ष कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न जोरकसपणे मांडणाऱ्या बाबुराव पुजरवाड यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.
आता त्यांनी राजकारणाच्या नव्या इनींगला प्रारंभ करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज माजी पालकमंत्री डी.पी.सावंत व आ.मोहनअण्णा हंबर्डे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.तर सुरेश अंबुलगेकर यांनी आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता असून सदैव माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
तेलंगणातील बीआरएस पक्ष आपल्या राज्याच्या बाहेर पक्षाच्या विस्ताराचा प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून नांदेडला बीआरएस प्रमूख तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान सुरेश अंबुलगेकर,बाबुराव पुजरवाड हे एका खासगी कामानिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी हैद्राबाद येथे गेले होते त्यांचे नातेवाईक बीआरएस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असल्याने नातेवाईकांच्या आग्रहातून त्यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली होती या भेटीचा फोटो समाज माध्यमात झळकल्याने विविध वावड्या व अफवा सुरु झाल्या होत्या
आयटीएम येथे शनिवार दि ४ फेब्रुवारी रोजी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांची भेट सुरेश अंबुलगेकर,बाबुराव पुजरवाड यांनी घेतली यावेळी आ.मोहन हंबर्डे,निलेश पावडे,नागोराव आढाव चिमेगांवकर,कृ.ऊ.बा.चे माजी संचालक दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बाबुराव पुजरवाड व अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या अंबुलगेकर यांचा माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,आ. मोहन हंबर्डे यांनी पुष्पगुछ देऊन सत्कार केला आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न असो की जिल्ह्याचा विकास केवळ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमांत झाला आहे
व यापुढे ही होणार आहे.
यामुळे राजकारणाच्या नव्या इनींगला प्रारंभ काँग्रेस प्रवेशाने केल्याची प्रतिक्रिया पुजरवाढ यांनी दिली तर आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता असून सदैव माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत असल्याचे अंबुलगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.