किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर * पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये समन्वय असावा : पी. आय. राजेंद्र पाटील

माणगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, राज्य युवाध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गायकवाड, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, समीर बामुगडे, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्य युवा अध्यक्षपदी नितीन शिंदे, कोकण युवा कार्याध्यक्षपदी सागर पवार, रायगड जिल्हा सल्लागारपदी ॲड. परेश जाधव, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली तसेच माणगाव तालुका कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगाव तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष सचिन पवार, तालुका उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, तालुका कार्याध्यक्ष मंगेश पवार, तालुका सचिव रवींद्र जाधव, तालुका सहसचिव राजेश जाधव, तालुका संघटक संतोष मोरे, तालुका सह संघटक मदन पवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष हिरवे, महिला तालुका अध्यक्षा मृणाली जाधव, महिला उपाध्यक्षा मानसी महाडीक, सचिव शितल सानप, तस्लिम अन्सारी तर सदस्य म्हणून अनिकेत कांबळे, परशुराम पवार, प्रकाश खैरनार, जनार्दन सावंत, आझाद पांडे, अक्षय सावंत, भालचंद्र खाडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पत्रकार व पोलिसांनी समन्वय साधून काम केल्यास चुकीचा मॅसेज बाहेर जाणार नाही म्हणून पत्रकार व पोलिसांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन केले. नायब तहसीलदार श्री पाटील यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

41 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.