बी.के.राठोड सर यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ सोहळा हुजपा विद्यालय कनकीच्या वतीने संपन्न
किनवट /प्रतिनिधी: हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकीचे ज्येष्ठ शिक्षक बी.के. राठोड/ बंडू किशन राठोड यांचे नियमित वयोमानानुसार निवृत्ती दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी झाली. तेव्हा काल बी. के. राठोड यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष )स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. शेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संचालक तथा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, संचालक प्रशांत रेड्डी, कनकी चे केंद्रप्रमुख पि. टी.राठोड,ईश्वर चव्हाण राजीव गांधी पंचायत राज संघटक महाराष्ट्र सचिव, प्रकाश चव्हाण सरपंच जरूर तांडा, निशांत जाधव कनकीतांडा,जानूसिंग पवार, सुरेश पवार बोथतांडा, उल्हास राठोड पोलीस पाटील बोथतांडा, माजी मुख्याध्यापक महाजन सर, माजी मुख्याध्यापक साबापूरे सर, श्रीमती रेखाताई चरडे, अजय जाधव पांढरकवडा, योगेश चव्हाण बँक मॅनेजर, कुणाल जाधव पीएसआय, कुणाल राठोड शिक्षक, चेतन राठोड शिक्षक, विद्यालयाचे मुख्याध्यापक शेंडे सर, इंगोले सर, भालेराव सर, बोनतावार सर, राजेंद्र ठाकरे, विष्णू मडावी, रामराव राठोड, पोचिराम मोहूर्ले, नरसिंग खांडरे, शेख इरफान सर आदी उपस्थित होते.
प्रथमतः थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलित करून करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवंद शिक्षकेतर कर्मचारी यांचा तर्फे बीके राठोड व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ. वनिताताई यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बीके राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनीही आपल्या वर्गातर्फे सरांना भेटवस्तू दिल्या.याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती बी.के.राठोड यांनी मनोगतातून आपली भावना व्यक्त केली.