माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपोषणगी अंजी पांधरा बिलोरी या पाच गावचा समावेश किनवट पोलीस स्टेशन हद्दीत झाला.
किनवट/प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक नांदेड यांचे कार्यालयाकडील आदेशान्वये माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपूर ,सिंदगी , अंजी ,पांदरा , बेलोरी या पाच गावांचा समावेश किनवट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झाल्या मुळे या पाच गावांना किनवट पोलीस स्टेशन चे पो. निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या स्टाफ सह ग्रामभेट देऊन गावांचा समावेश किनवट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांची मीटिंग घेऊन गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ यांना दिली.
तसेच पोलीस पाटील व सरपंच यांना या बाबत गावात दवंडी देणे, सोशल मीडिया वर याबाबत सर्व ग्रामस्थांना कळविणे बाबत सांगितले .
आज पासून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी माहिती देण्यात आली.