गोकुंदा जिल्हा परिषद गट अनु.जमातीसाठी राखीव झाल्यास निवडणूक लढवणार -जितेंन्द्र अ.कुलसंगे
किनवट: काही महिन्यातच होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडनुकीसाठी जर गोकुंदा गट अनुसुचित जमाती महिला , पुरुष ( एस .टी . प्रर्वग राखीव ) झाल्यास राखीव आरक्षण सुटल्यास आणि भाजपा पक्षाने व वरिष्ठांनी मला विश्वासात घेवून भाजपा पक्षाची उमेदवारी दिल्यास मी सर्पूण ताकदीनशी निवडणूक लढवून विजयास पात्र ठरनार असा पत्राद्वारे जितेंन्द्र अ.कुलसंगे यांनीकळविले आहे.
गोकुंदा जिल्हा परिषद गट येणारा गोकुंदा, घोटी , सिरमिटी ,कमठाला, धामनदरी , गणेशपुर,खेरडा, मलकापूर , घोगरवाडी , दिगडी म .झेंडीगूडा , प्रधानसांगावी, कोठारी चि , शनिवारपेट, मदनापुर , भुलजा , दाभाडी ,दरसांगवी चि , राजगडतांडा ,गांव, मांडवा ,भिमपुर, नागझरी, गाव, गोकुंदा जिल्हा परिषद मधील गाव ,तांडे ,वाडया,पाटे, वस्ती शहर गांव, सर्पुण गोकुंदा जि .प . गट सर्कल मध्ये दाडंगा जनर्तक व मित्र परीवार व समाज बांधव आहेत असे जितेंन्द्र अ . कुलसंगे यांनी सांगितले.
परंतु अद्यापही आरक्षण जाहिर झाले नाहीत .परिणामी दोन्ही तालुक्यातील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत तरीपण आपापल्या परिने कार्यकर्ते आपल्या बाजुने खेचण्याचा प्रकार सुरू झाला आहे . त्याचाच एक भाग म्हनुन युवकांची फळी व परिसरातील जनसामान्याच्या संपर्कात असलेले भाजपा कार्यकर्ते जितेंन्द्र अ. कुलसंगे यांनीही अनुसूचित जमाती महीला / पुरुष , झाल्यास एस.टी . प्रर्वग सर्कल राखीव सुटल्यास भाजपा पक्षाने उमेदवारी मागणार असल्याचे त्यांनी सांगीतले .