किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उर्वरित हप्ता तात्काळ द्या; अन्यथा येत्या पंधरा दिवसात कुटुंबियासह नगरपरिषद समोर उपोषणाला बसणार-महिला

किनवट /प्रतिनिधी: पंतप्रधान घरकुल योजनेतील उर्वरित हप्ता मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद यांना महिलांच्या वतीने देण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आम्हाला शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे . घराचे बांधकाम चालू केलेले आहेत. आमचे उदरभरण हे रोजंदारीवर आहे व आर्थिक परिस्थिती ही हालाखीची आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याने आमचे कुटुंब वाऱ्यावर लटकल्याप्रमाणे झालेले आहे. तरी चालू असलेल्या घर कामाकरिता आमच्याकडे पैसे नसल्याने अतोनात हाल होत आहेत. चालू असलेल्या बांधकामामुळे आम्ही भाड्याने घर घेऊन राहत आहोत. त्यामुळे दुहेरी आर्थिक भुर्दंड आर्थिक आमच्यावर पडत असल्याने आम्ही प्रचंड आर्थिक चनचनीला सामोरे जात आहोत.
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उर्वरित हप्ता तात्काळ उपलब्ध करून देऊन आम्हाला सहकार्य करावे. अन्यथा येत्या पंधरा दिवसात आम्ही आमच्या कुटुंबियासह नगरपरिषद प्रारंगणामध्ये उपोषणाला बसणार आहोत असा इशाराही महिलांच्या वतीने देण्यात आला आहे.

482 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.