किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मंत्री चंद्रकांत पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा,या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन.

किनवट,दि.१२:* बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणिवपूर्वक अवमान करणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटिल यांचा तात्काळ राजिनामा घेऊन त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व समता सैनिक दलाचे मनोज गिरबडे यांच्यावर शाईफेक प्रकरणी दाखल केलेले गंभीर गुन्हे परत घ्यावेत,या मागणीसाठी आज (दि.१२) सकाळी ११वाजेच्या सुमारास शहरातील जिजामाता चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिव -फुले-शाहू -आंबेडकर प्रेमी युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘पीरिपा,’चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार,सुरेश मुनेश्वर,अॅड‌.सम्राट सर्पे, निखिल कावळे,निवेदक कानिंदे,राजु कांबळे,निखिल सर्पे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

234 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.