कै.भाऊराव राठोड पुण्यस्मरण दिन संपन्न
किनवट: साने गुरूजी रुग्णालयाचे व्यवस्थापक डाॅ. अशोक बेलखोडे साहेबांच्या प्रचंड सेवा, सुश्रृषा, त्याग आणि समर्पणात मी आणि माझ्या परिवाराचा एक खारीचा वाटा असावा असा संकल्प मी बर्याच दिवसांपासून केलेला होता. तो दिवस आज वडिलांच्या पुण्यस्मरणा प्रीत्यर्थ उजाडला.
वडिलांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मी सरस विद्यालय मांडवी येथील एक शिक्षक नात्याने आज वडिलांच्या स्मृतीला उजाळा देत आदरांजली वाहिली आणि इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सहाशे विद्यार्थ्यांना चॉकलेटच्या स्वरुपात खाऊ वाटप करण्यात आले. आदरणीय डाॅक्टर साहेब, इंदिराबाई राठोड ट्रस्ट मांडवीचे सन्माननीय विश्वस्त आहेत. या संपूर्ण मांडवी नि साने गुरूजी रुग्णालय परिवारातील अतूट ऋणानुबंधाच्या नात्याचा मी एक अंश आहे.
डाॅक्टर साहेबांनी किनवट तालुक्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात आपले संपूर्ण वैद्यकीय ज्ञान नि सेवा पणाला लावून *दि. 12 जानेवारी 2020 पासून त्यांनी लोकसहभागातून साने गुरूजी मल्टीस्पेशालीटी हाॅस्पिटलच्या* पायाभरणीला सुरूवात केली. आज रुग्णालयाची भव्यदिव्य वास्तु डौलाने उभी राहत आहे.
आजपर्यंत डाॅक्टर साहेबांनी लाखाच्यावर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हजारो दलित, पिडीत, वंचित, उपेक्षित, गोर गरीब, आदिवासी, भटक्या विमुक्तांना आरोग्यात्मक सेवा पुरवून जीवदान दिले आहे.
मा. बेलखोडे साहेबांशी, माझे नाते 1993 पासूनचे, सेवामय त्यागानी झपाटलेले, प्रचंड उर्जावान व्यक्तिमत्त्व मी त्यांच्यात आजतागायत पाहतो आहे. म्हणून त्यांच्या संकल्प सिध्दीत माझा कुठेतरी नगण्य वाटा असावा. ही लहानसी मनोकामना मी बाळगलेली होती. कारण या भव्य वास्तुच्या कोनशिला समारंभाचा मी एक साक्षीदार आहे.
साने गुरूजी रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त दि. 24 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या करोडोंच्या वास्तुस्थापनेत माझ्या पाच हजार एक रुपयाची (5001₹.) अत्यल्प निधी त्यांच्या हाती सुपूर्द करण्याचा मानस मी केलेला आहे.
आदरणीय बेलखोडे साहेबांच्या अहोरात्र, अखंडित सेवा सुश्रृषा, सेवामय त्यागाला माझे त्रिवार वंदन
*डाॅ.वसंत भा.राठोड, किनवट.*
*मो. नं. – 9420315409*
———————————————————