किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पंचायत समिती किनवट कार्यालयात “शिवस्वराज्य दिन

किनवट : रविवार (दि.0 6 जून) रोजी सकाळी 9 वाजता येथील पंचायत समिती कार्यालयात “शिवस्वराज्य दिन ” निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उप सभापती कपिल करेवाड,माजी उप सभापती तथा विद्यमान सदस्य गजानन कोल्हे पाटील , गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन केले.
याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पशुधन विकास अधिकारी डॉ. सायन्ना आडपोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, लेखाधिकारी अरुण संकनेनीवार, कृषी अधिकारी संजय घुमटकर, विस्तार अधिकारी एस.एन.शिंदे, चिंतावार, राजेश मॅकलवार, तांत्रिक सहायक सचिन येरेकार, मदने, आदिंसह सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक कलावंत सुरेश पाटील यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाईले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राम बुसमवार यांनी आभार मानले.

शासन परिपत्रकान्वये ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये “ शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करण्याबाबतचे निदेश दिले होते. ध्वज हा उच्च प्रतीचे सेंटीन असलेली भगवी जरी पताका ३ फुट रुंद आणि ६ फुट लांब या प्रमाणात म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी . तो जिरेटोप , सुवर्णहोन , जगदंब तलवार , शिवमुद्रा , वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा. कमीतकमी १५ फुट उंचीचा वासा किंवा बांबु शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून असावा . त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी .
शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमधे रिता करुन रयतेची झोळी सुख , समृध्दी , समता व स्वातंत्र्याने भरली म्हणुन शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा ” सुवर्ण कलश ” बांधावा . त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात . नंतर पुष्पहार , गाठी , आंब्याची डहाळी बांधावी . शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी . अशा कार्यपद्धतीचा वापर करून “ शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करावा असे सूचविले होते. त्यानुसार पंचायत समितीत शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

118 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.