किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सीटूच्या धरणे आंदोलनास वीस दिवस पूर्ण,जिल्हा परिषदे समोर केले तीव्र निदर्शने (शिक्षण अधिकारी मुर्दाबाद च्या घोषनांणी परिसर दनाणला)

नांदेड : दिनांक २८ जुलैपासून सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे बेमुदत्त धरणे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे.मौजे काकांडी तर्फे तुप्पा येथील सिंचन विहिरीचे थकीत बिल ग्रामसेवक,अभियंता व गटविकास अधिकारी यांनी रोखले आहे. त्यांच्यावर कारवाई करून शेतकरी देविदास देशमुख यांचे बिल अदा करावे तसेच नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर नांदेड या शाळेची मूळ संचिका तपासून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. खोटी विद्यार्थी पट संख्या दाखविणाऱ्या मुख्याध्यपकावर कारवाई करावी. शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करावी.विना बांधकाम परवानगी असलेली व जीर्ण झालेली शाळेची इमारत सील करावी. गांधीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेमध्ये संचालकाच्या मुलीने अवैध बंगला बांधला आहे ते अतिक्रमण काढून टाकावे. उपरोक्त शाळेतील पिढीत सहशिक्षक आशा माधवराव गायकवाड व केशव रामजी धोंगडे या शिक्षकांना संस्थेने तीस वर्षे अध्यापनाचे कार्य करून घेतले आहे.परंतु त्यांचा अप्रोल न काढता इतर लोकांचा अप्रोल काढला आहे.त्या शिक्षकानी केलेल्या कामाचा मोबदला किमान वेतन कायद्यानुसार देण्यात यावा. आदी मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून सीटूचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. गोपीनाथ देशमुख यांनी दि.२८ जुलै पासून सात दिवस उपोषण देखील केले आहे. तीन ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने देखील करण्यात आली आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी आंदोलनाची अध्याप दखल घेतलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीटूच्या वतीने दि.८ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले असून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील पाठपुरावा करणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्यात आल्या असून तशी पोच पावती सीटूने प्राप्त करून घेतली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट रोजी आंदोलनास तात्परती स्थगती देण्यात आली होती. ते आंदोलन पुन्हा दि.१७ ऑगस्ट पासून जोरदार निदर्शने करून जिल्हा परिषदे समोर सुरु केले असून शकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण घोषणा देत जि. प.च्या शिक्षण व ग्रामपंचायत विभागास धारेवर धरले आहे.
गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी मुर्दाबादच्या घोषणाणी जि.प. चा परिसर दनाणून गेला होता.
धरणे आंदोलनांमधील मागण्या पूर्ण होत नसल्याने सिटूच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे,कॉ.सचिन कंधारे,कॉ.गोपीनाथ देशमुख, कॉ.गंगाधर खुणे,कॉ. सचिन खंदारे, कॉ.खंडेश्वर केदारे, कॉ. सगेश खंदारे, कॉ.रवी धोंगडे,कॉ. विशाल धोंगडे,कॉ.सूरज साबळे,कॉ.आकाश केदारे आदींची उपस्थिती होती.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री ठोंबरे यांच्या कक्षात शिष्टमंडळासोबत चर्चा झाली असून दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता गट शिक्षणाधिकारी पं.स.नांदेड श्री नागराज बनसोडे यांच्या कक्षात सुनावणी घेण्याचे पत्र शिक्षण विभागाने काढले आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा सीटूच्या वतीने यापूर्वीच प्रशासनास देण्यात आला असून प्रजा बालक विद्या मंदिर शाळेच्या संचालक मंडळातील लोकांकडून कॉ.गंगाधर गायकवाड यांना सुपारी देऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
तरी देखील ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरु राहील असे सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.

171 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.