सरसकट पिकांचे पंचनामे करा–आ. जितेश अंतापुरकर
कुंडलवाडी प्रतिनिधी
देगलूर /बिलोली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार जितेश भाऊ अंतापुरकर,बिलोली काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर यांनी आरळी गटातील हुनगुंदा नागणी माचनूर या नदी काठावरील गावांना दि.२५/७/२२ रोजी भेटी देऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
राज्यामध्ये अनेक दिवसापासून पावसाने हाहाकार माजला असल्यामुळे जितेश भाऊ अंतापुरकर यांनी ताबडतोब मंत्रालय गाठून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावे यासाठी भेट घेतल्याची स्पष्ट करत. आपल्या देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत असून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून केले असल्यामुळे
बिलोली मतदार संघातील आरळी गटातील हुनगुंदा, येथे प्रत्यक्ष भेट देण्यात आले त्याप्रसंगी छोटे खाणी बैठकीत समालोचनपर भाषणात शिवलिंग पा. धावंडे यांनी ओव्हरलोड वाहतुकीमुळे रोडावर झालेले मोठ मोठे खड्डे याकडे आमदाराचे लक्ष वेदण्याचा प्रयत्न केले , आमदाराने लगेच त्या विभागाला फोन करून सूचना दिल्या व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी छोटे छोटे प्रश्न त्या त्या डिपार्टमेंटला फोन करून सोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रसंगी तहसीलदार निळे गटविकास अधिकारी मुक्कावार ,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच प्रतिनिधी नागेश प्याटेकर उपसरपंच प्रतिनिधी योगेश भाले, ग्रा.प. सदस्य महेंद्र मराठे.ग्रा .प. सदस्य संजय गायकवा