मौजे मांजरी ता.किनवट जि. नांदेड या गावाला साधा रस्ता नसल्याने हलाखीच्या परिस्थिती मध्ये बैलगाडीने रुग्णाना दवाखान्यात न्यावे लागते
किनवट: मौजे मांजरी ता.किनवट जि. नांदेड या गावाला साधा रस्ता नसल्याने हलाखीच्या परिस्थिती मध्ये बैलगाडीने रुग्णाना दवाखान्यात नेतांना रुग्ण मरण पावतो आहे.. ही अत्यंत दुःखद घटना असून आदिवासी गावांत अजुनही कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर ही आदिवासी माणसं जीवन मरणाशी झुंज देत आहेत..आधुनिक संगणकाच्या युगात साध्या रस्ताच्या सुविधा अजुनही उपलब्ध होत नसेल तर हा घोर अन्याय नव्हे का?? येथील प्रशासनाला आता तरी जाग येईल का??असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
621 Views