किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या निर्घृण हत्येची एस.आय.टी.मार्फत चौकशी व्हावी

नांदेड दि. 13 –
वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या घालून केलेल्या निर्घृण हत्येची माहिती महाराष्ट्र शासनास व गृहविभाग कळवून ही घटना अतिशय वेदनादाई व गंभीर असल्याने शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन या प्रकरणासाठी शासनामार्फत एस.आय.टी.ची स्थापना करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने देण्यात आले.
अत्यंत अल्पावधीत आपल्या सोज्वळ व नम्र स्वभावाने सुपरिचित झालेले आणि आपल्या कर्तव्याने नाव गरूडाच्या भरारीप्रमाणे उंचीवर नेणारे व आरोग्य सेवेला पूर्णपणे समर्पित झालेले आणि शेकडो-हजारो रूग्णांना जीवदान देणारे गरिबाचा डॉक्टर म्हणून उमरखेड तालुक्यात जीव ओतून वैद्यकीय सेवा देणारे नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र डॉ. हनुमंत धर्मकारे (वैद्यकीय अधिकारी, उत्तरवार शासकीय रूग्णालय, उमरखेड) या बालरोग तज्ज्ञांची, शासकीय अधिकारी यांची भरदिवसा व भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण खून दि. 11 जानेवारी रोजी उमरखेड शहरातील गोरखनाथ हॉटेलच्या समोर दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घडल्याची बातमी महाराष्ट्रभर वार्‍यासारखी तीव्र स्वरूपात उमटलेली आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला बिहारचे स्वरूप देणार्‍या व चांगल्या वैद्यकीय सेवेला मोडून काडणार्‍या आणि कलंकित करणार्‍या या निंदणीय, अमानवी घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवून मुख्यमंत्री व गृहविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणासाठी एसआयटी स्थापून उच्चस्तरीय चौकशी करावी व या घटनेतील सर्व आरोपी आणि या घटनेमागील मास्टरमाईंड यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी व त्यांच्याविरूद्ध खुनाच्या गुन्ह्याबरोबरच मोक्का कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवून, कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन व विविध सामाजिक संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर सतीश कावडे, चंपतराव हातागळे, प्रा. विठ्ठल भंडारे, अ‍ॅड. एल.बी. इंगळे, राहुल तेलंग, भारत खडसे, उत्तम गवाले, गोपाळ वाघमारे, आनंद वंजारे, माधव गोरखवाड, मॅनेजर गायकवाड, भीमराव बल्लूरकर, संतोष गडंबे, संजय देवकांबळे, गंगाधर कावडे, शंकरराव गायकवाड, नामदेव कार्लेकर, डॉ. जिरोणेकर, विश्वनाथ गाडेकर, प्रा. जी.एल. सूर्यवंशी, गणपत चिवळीकर, संभाजी सोमवारे, लोकेश कांबळे, डॉ. प्रदीप घाटे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

487 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.