आगाखान प्री स्कुल येथे शिक्षक दिन साजरा
किनवट ता. बातमीदार:-
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशे शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे.
५ सप्टेबंर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन आगाखान एज्युकेशन सेंटर किनवट संचलीत आगाखान प्री स्कूल येथे दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषा परीधान केल्या होत्या तसेच प्रमुख अतिथीनी शिक्षक दिना बद्दल माहीती सांगीतली
शाळेत सजावट करण्यात आली व विद्यार्थ्यांना खाऊ, अल्पोपहार देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का पेन्शनवार, संस्थेचे सचिव करीम जीवाणी, नुरजंहा जीवाणी, मुनीरा जीवाणी, फेरोज हिराणी शिक्षीकावृंद शाहीन चरनीया, शितल गजेन्गीवार, पुजा बंडेवार आदी उपस्थित होते.