किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माजी खासदार भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश!

नांदेड : भाजपच्या गटबाजीला कंटाळून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपच्या सदस्य व पदाचा राजीनामा देऊन अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले
देगलूर बिलोली मतदार संघाची निवडणूक चालू असताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसचा उमेदवार विजयी करणार असून मला काँग्रेस पक्षाने मोठे केले होते मी तीन वेळा खासदार तीन वेळेस आमदार राहिलो आहे भाजपमध्ये मागील सात वर्षांपासून होतो परंतु येथील खासदार यांनी मला एकदाही विश्वासात न घेता स्वतः सूत्रे हलवत आहेत याबाबत मी पक्षाकडे तक्रार केली परंतु माझे समाधान झाले नाही सध्या सुरू असलेल्या देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत बाहेरचा उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे मी बरेच नेत्यांना मध्ये घेऊन आलो होतो परंतु व पक्ष वाढवला होता मात्र येथील चिखलीकर यांच्या नेतृत्वामुळे अनेक कार्यकर्ते नेत्यांचा नारायणाची असून मी सुद्धा नाराज असल्यामुळे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे मी भारतीय जनता पक्षाशी नांदेड जिल्ह्यात जोमाने वाटचाल सुरू असताना शिवसेनेत कार्यरत असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपात घेण्यात आले त्यानंतर त्यांनी भाजपच्या निष्ठावंतावर अन्यायाची मालिका सुरू केली अवघा पक्ष चिखलीकरांच्या नावं ईलाबाद लागेला भाजपातील जुने निष्ठावंत व आमच्यासारखी झोकून देऊन काम करणारी मंडळी बेदखल करण्याचे काम चिखलीकर यांनी सुरू केलेले भारतीय जनता पक्ष हा पक्ष म्हणून ओळखला जातो परंतु संघटनेची काम खासदार चिखलीकर यांनी जिल्ह्यात केली आहे ही बाब अनेकदा राज्याच्या नेतृत्वाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतरही दुर्दैवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले उलटपक्षी चिखलीकरांना अधिक ताकद देऊन भारतीय जनता पक्षात होणाऱ्या अन्यायाचा एक प्रकारची खतपाणी घातले गेले
देगलुर बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते परंतु तसे न करता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली म्हणजे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ठरवायचा आणि त्यांच्या प्रभाव नंतर त्यांचे सारे खापर माझ्यावर फोडायच असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसू लागले होते खरे तर राज्यात नेतृत्वाचे मध्यस्थी करून एखाद्या निष्ठावंत किंवा नवा चेहरा दिला असता तर जोरदार लढत झाली असती पण मी इतरांचे एेकणार नाही अशी भूमिका घेऊन काम करणारे खासदार चिखलीकर यांनी स्वतः साठी असलेले एक संधी गमावून टाकली संपूर्ण पार्श्वभूमीवर माझ्या समवेत काम करणारे गावातील सहकारी संतप्त झाले आहेत जिथे किंमत नाही तिथे कामच काय करायचे असा त्यांचा सवाल आहे त्यांनी ही भावना माझ्याकडे म्हणून बोलून दाखवली अन्यायाची ही मालिका खंडित झाली पाहिजे अन्यथा दुसरा पर्याय शोधावा अशी सूचना मला अनेक सहकाऱ्यांनी केली एकूणच भाजपातील एकाधिकारशाहीला मित्रमंडळाचे वर्चस्व निष्ठावंतांची मुस्कटदाबी व दलबदलू प्रोत्साहन यामुळे नांदेडची भाजप अजून चिखलीकर यांचे वैयक्तिक मालमत्ता झाली आहे अशा ठिकाणी काम करणे माझ्या मनाला पटणार नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असून आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे माझ्या सोबत माजी आमदार तथा भाजप कार्यकारिणी सदस्य प्रकाश पोकरणा नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर सरजितसिंघ गिल कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबाराव पाटील भाले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधी गुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रवि पाटील खतगावकर भाजप जिल्हा सचिव आनंदराव पाटील बिराजदार भाजपचे उत्तर नांदेड विधानसभा माजी अध्यक्ष दीपक पावडे आदी प्रमुख पदार्थ भाजपचा राजीनामा देत असून ती देखील माझ्यासमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले
देगलूर बिलोली विधानसभेचा उमेदवार अंतापूरकर ची ताकद वाढवून त्याला निवडून आणणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले
आम्ही वाट चुकलेली वाट सरू … आमदार पोकर्णा
आम्हाला काँग्रेस पक्षांनी विविध पदे देऊन कार्यकर्त्या पासून आमदार पर्यंत पोहोचण्याचा काम केलं असून आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण असून त्यांनीच आम्हाला मोठं केलं आम्ही काही चुकून वाट चुकलो होतो त्यामुळे आम्ही आता अशोकराव च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून आम्ही वाट चुकलेले वाटसरू असून आम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे असे मत या पत्रकार परिषदेत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी व्यक्त केले

121 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.