जुलै २०२१ मध्ये आलेले धमकी पत्र खा.चिखलीकरांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सार्वजनिक केले
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.रिंदा या गुंडाने जुलै २०२१ मध्ये खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना लिहिलेले १० कोटी रुपयांच्या खंडणीचे पत्र आज पत्रकारांसमोर सार्वजनिक केले.सोबतच खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी पोलीसांनी गांभीर्याने घेतले नाही असेही सांगितले.सोबतच मला संरक्षण न देणे आणि उचित कार्यवाही न करण्यासाठी राजकीय वरिष्ठांचे दबाव असल्याची माहिती मिळत असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात लिहिले आहे.
कांही दिवसापुर्वी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी २० एप्रिल रोजी संजय बियाणी हत्याकांड बाबत मी स्वतः धरणे आंदोलन करणार आहे असे सांगितले होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येणार्या अनेक रस्त्यांवर प्रताप पाटील चिखलीकर मित्र मंडळाच्या गाड्या उभ्या होत्या. धरणे आंदोलनात बोलतांना प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरपूर कांही सांगितले.सोबत जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन दिले.त्या निवेदनाच्या प्रति विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांना आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिल्याचे या निवेदनावर लिहिलेले आहे. जुलै २०२१ मध्ये त्यांना रिंदा हे नाव लिहिलेले एक पत्र आले होते. त्या पत्रावर खा. श्री. प्रताप पाटील चिखलीकर वसंतनगर नांदेड असा पत्ता लिहिलेले आहे.या पत्रातील भाषा तोडक्या-मोडक्या हिंदीत लिहिलेली आहे.सोबतच पत्रातील अक्षरे सुध्दा कोणी तरी थोड्याशा शिक्षीत व्यक्तीने लिहिल्यासारखे दिसतात. त्यात अर्वाच्च शिवीगाळपण आहेत.
आणि ८ दिवसात १० कोटी रुपये दिले नाही तर आपला अंत आहे असे खासदारांना उद्देशून लिहिलेले आहे.आज संजय बियाणी हत्याकांडाच्या निदर्शनात हे पत्र खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सार्वजनिक केले.या संदर्भाने दिलेल्या निवेदनात विषयमध्ये नांदेड जिल्ह्यातील कायदा,सुव्यवस्था व धमकी पत्राबाबत योग्य कार्यवाहीची अपेक्षा अशी लिहिलेले आहे.याच निवेदनात मला सुरक्षा देण्यासंदर्भाने वरिष्ठ राजकीय लोकांचा दबाव प्रशासनावर आहे असेही नमुद आहे.
त्याशिवाय जिल्ह्यात अनेक अवैध धंद्यांचा उल्लेख आहे. जेलमध्ये असलेल्या आणि नोकरीत असतांना सर्वांशी संपर्कात राहणार्या पोलीस निरिक्षकाचा उल्लेख निवेदनात नाही परंतू भाषणात केला होता.
जानेवारी २०२२ नंतर गेल्या चार महिन्यात गुन्हेगारीचा आलेख पाहिल्यास नांदेड व परिसरात २५ खूनाच्या घटनांची नोंद आहे असे लिहिलेले आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यास, त्यांना जेरबंद करण्यात स्थानिक पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची लोकभावना आहे असे या निवेदनात लिहिले आहे. माझ्यासारख्या संसद सदस्याला धमकी आल्यानंतर ती घटना गांभीर्याने हाताळण्याची गरज होती. पण तसे झाले नाही असा खेद निवेदनात व्यक्त केला आहे.