किनवट-माहुर भाजपा चे खरे किंगमेकर सुर्यवंशी पाटिलच – लक्ष्मीकांत मुंडे
किनवट: गेल्या कित्येक वर्षापासुन बॅकफुटवर गेलेल्या व मरगळ आलेल्या पक्षाला नवसंजीवनी देवुन किनवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता आनणा-या सुर्यवंशी पाटील यांचा पक्षातील कार्यकर्त्यांना विसर पडता कामा नये असे मत भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा युवा पत्रकार व गोकुंदा पंचायत समीतीचे इच्छुक उमेदवार लक्ष्मीकांत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
किनवट-माहुर मतदार संघ तसा खुप मोठा व शेकडो वाड्या तांड्यांनी वसलेला निसर्गाच्या अनमोल ठेवींनी नटलेला मतदार संघ परंतु गेल्या अनेक दशकांपासुन या मतदार संघाचा व्हावा तसा विकास मात्र झाला नाही.याला कारणीभुत कोण ? असा सवाल आजतागायत अनुत्तरीतच आहे.नेमके एैन विधानसभेत जनतेवर लादलेले नवखे उमेदवार की अविकसीत व दुर्लक्षीत, उपेक्षीत भोळीभाबडी जनता….पण मागील काहीवर्षापासुन मात्र सगळ चित्र बदलताना दिसत आहे म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी तसेच प्रतिस्पर्धी जर खंबीर असेल तर स्पर्धा करायलाही स्पर्धकाला बळ लावावे लागते अगदी तसच काही किनवट-माहुर मधे बघायला मिळाले.
भाजपाने जसा मा.सुर्यवंशी साहेबांच्या रुपाने किनवट-माहुरच्या लोकांना नवा चेहरा दिला तसा तत्कालीन विद्यमान आमदाराच्या कामाला जोर आला. एकीकडे भाजपाला आलेली मरगळ झटकुन कार्यकर्त्यांची फाैज जमवण्यात ही अगदी राजकारणात पटाईत नेत्याप्रमाणे सुर्यवंशी साहेबांनी कसर ठेवली नाही.न भुतो न भविष्यती अस यश भाजपाला किनवटच्या नगर परीषद व पंचायत समितीत मिळवुन दिल.जनु काही कार्यकर्त्यांमधे नवचेतनाच निर्माण झाली.सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना सर्वतोपरी मदत करुन निवडुनही आणल आणि उच्चपदावर बसवल ही हे जनतेने आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही विसरुन चालणार नाही.
येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकीतही साहेबांच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले असुन सुर्यवंशी साहेब नेमकी काय खेळी खेळणार व पुन्हा एकदा पंचायत समितीसह जिल्हा परीषदे वरही सत्ता आनणार का हि भिती कायम विरोधकांना असणारच कारण यावेळी तर किनवट चे विद्यमान आमदार मा.केराम साहेब व नांदेडचे खासदार मा.प्रतापराव पटील चिखलीकर ही भाजपाचेच असल्यामुळे अवघड वाटणारे सत्तेचे गणीत मा.अशोकराव सुर्यवंशी साहेब अगदी सहज सोडवतील असा विश्वास भाजपाचे युवा नेते व गोकुंदा गणाचे पंचायत समितीचे भावी उमेदवार लक्ष्मीकांत मुंडे यांनी व्यक्त केला.