किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. सुरेश दामरे यांच्या उपोषणाला सुरुवात

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.5.विद्यार्थ्यांच्या हितार्थ केलेल्या मागण्यांकडे, विद्यापीठ प्रशासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्यामुळे,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे अधिसभा सदस्य प्रा. सुरेश दामरे यांनी विद्यापीठ इमारतीच्या प्रवेश द्वारात आज आपल्या उपोषणाला सुरुवात केली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या पी.एच.डी.कोर्स परीक्षा, या ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात यासह, विद्यार्थी हीताच्या इतर मागण्या मान्य करण्यात याव्यात,अन्यथा येत्या 5 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा अधिसभा सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी कुलगुरूंना लेखी दिला होता.त्याप्रमाणे त्यांनी उपोषणास सुरुवात केली.

विद्यापीठ प्रशासनातर्फे पी.एच.डी.परीक्षेबाबत आत्तापर्यंत चार वेळेस तारखा बदलण्यात आलेल्या आहेत.यावरून विद्यापीठ प्रशासन हे परीक्षा घेण्याच्या नियोजनाबाबत कमी पडत आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.परीक्षेसाठी पात्र असलेले विद्यार्थी हे फक्त मराठवाड्या पुरते मर्यादित नसून,महाराष्ट्र राज्य व इतर राज्ये आणि परदेशातील देखील आहेत.सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था लक्षात घेता, वारंवार परीक्षेच्या तारखेत होणारे बदल हे विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण निर्माण करणारे आहेत.

सध्या सुरू असलेली कोवीड-19 सदृश्य संभाव्य रोगांची लाट, एस.टी.चा चालू असलेला संप आणि वेळोवेळी परीक्षांच्या तारखा होणारे बदल या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता, ही परीक्षा विद्यार्थी हितासाठी ऑनलाईन पद्धतीने घेणे हेच सोयीचे आणि विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे, असे प्रा.दामरे यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या निवेदनात म्हटले होते.त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी,अन्यथा विद्यार्थी हित लक्षात घेऊन, येत्या पाच जानेवारी पासून मी स्वतः विद्यापीठासमोर उपोषणास सुरुवात करीन असा इशारा प्रा सुरेश दामरे यांनी कुलगुरूंना दिला होता.

विशेष म्हणजे रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दि. 31 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या परिपत्रकात, विद्यापीठातर्फे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या अन्य परीक्षा संदर्भात एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यात क्रमांक एक नुसार काही परीक्षा ऑफलाईन तर काही परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी सुचित करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी पी.एच.डी.पात्रता परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यापीठास काही हरकत नसावी.उलट सध्या सर्वत्र सुरू असलेल्या संसर्गजन्य रोगांच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर , विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी याकडे लक्षवेधण्याचा प्रयत्न प्रा.दामरे यांनी केला.पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने उदासीन भूमिका घेणाऱ्या विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरू यांनी यावेळीही दामरे यांच्या निवेदनातील मागण्याची दखल घेतली नाही.त्यामुळे नाईलाजाने दामरे यांनी आज विद्यापीठाच्या प्रवेश द्वारातच हवन करुन उपोषणास सुरुवात केली.

पी एचडी कोर्स परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी या मुख्य मागणी शिवाय, कोवीडच्या सर्व उपाययोजना करून, वस्तीगृह त्वरित चालू करावे,

दयानंद कॉमर्स कॉलेज येथील प्रा. दायमा यांच्याकडून घडलेल्या गैर प्रकाराविषयी त्वरित सविस्तर माहिती देण्यात यावी, डॉ. बाबासाहेब अध्यासन व अभ्यास केंद्रात एम.ए.इन डॉ.बाबासाहेब थॉट अँड सोशल जस्टीस हा कोर्स त्वरित सुरू करण्यात यावा,यासह एकूण आठ मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले आहे.त्यामुळे जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका प्रा.सुरेश दामरे यांनी घेतली आहे.

एखाद्या विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यालाच विद्यापीठाच्या कुलगुरू आणि प्रशासनाच्या विरोधात,विद्यार्थी हिताच्या न्याय मागण्यांसाठी उपोषणास बसावे लागावे,हा प्रकार निश्चितच विद्यापीठाचा आडमुठा कारभार आणि उदासीनता अधोरेखित करणारा आहे.

510 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.