किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

संत शिरोमणी गोरबा काका यांचे विचार सर्वानी आत्मसात करावे.आ.मोहनअण्णा हंबर्डे;संत शिरोमणी गोरोबा काका यांची 704 वी पुण्यतिथी सोहळा संपन्न

स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था नांदेड आयोजित

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

दि 9 मे 2021 रोज रविवारी दुपारी 12 वाजता नांदेड दक्षिणचे शांतताप्रिय आमदार मा. मोहनरावजीअण्णा हंबर्डे यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या अत्म्यतेने कुंभार समाजाचे आराध्य दैवत संतांचे संत वैराग्याचे महामेरु संत शिरोमणी गोरोबा काका यांची 704 वी पुण्यतिथी हि नांदेड येथे काकांच्या मंदिरासाठी संस्थेने विकत घेतलेल्या 2650 स्क्वेअर फुट जागेत म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा सिडको नविन नांदेड येथे कोरोनाचे नियम पाळुन साजरी करण्यात आली.
सकाळी दहा वाजता संघटनेचे पदाधिकारी नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी येउन काकांच्या प्रतिमेची पुजा करुन ह.भ.प. राम महाराज पांगरेकर यांच काकांच्या चरित्रावर प्रवचन ठिक आकरा वाजता सुरु झालं त्यात काकांच्या जिवनावर प्रकाश टाकला श्रोत्यानां गहिवरुन आलं काकानी कुंभार समाजात जन्म घेतला ते आपल महत भाग्य असल्याचं त्यानी सांगितलं आणि पुण्यतिथी कोणाची होते व का करावी हे त्यांच्या प्रवचनात सांगुन सर्वांच मन मोहुन टाकत प्रवचन केलं.ठिक साडे आकरा वा. मा.आमदार मोहन अण्णा हंबर्डे साहेबांच यांचे आगमन झालं.त्यानी सुध्दा आरधा तास मंत्रमुग्ध होउन महाराजांच प्रवचन एेकलं.ठिक बाराला पाच मिनिटे कमि असताना काकांच अभंग महाराजाने घेतलं आणि ठिक बाराच्या ठोक्याला गुलाल उधळुन काकांच्या नावाचा जल्लोश करुन पुण्यतिथी साजरी केली त्या नंतर आमदार साहेबांच्या व सर्व मान्यवरांच्या हस्ते काकांची आरती करण्यात आलि व प्रसाद देउन पुण्यतिथी सोहळा करण्यात आला.
तदनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यांत आला सर्वप्रथम हभप राम महाराज पांगरेकर यांचा सत्कार मा आमदार मोहन आन्ना हंबर्डे साहेब यांच्या हस्ते केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आमदार मोहन आन्ना हंबर्डे साहेब यांचा सत्कार संघटनेच्या वतिने जिल्हाध्यक्ष मा.विजयराव देवडे यानी केला. त्या नंतर संघटनेच्या वतिने मा.मनोहर पाटिल शिंदे जि प सदस्य नांदेड ,मा.संतोष मोरे नगरसेवक वसरणी ,मा.पिंटु पाटिल धनेगावकर,सरपंच धनेगाव,मा हरजिंदर सिंधु कॉँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख,मा.पुंडलिकरावजी घुमलवाड,मुख्य मार्गदर्शक
मा.विजयराव देवडे लहानकर,जिल्हाध्यक्ष नांदेड ,मा.शंकरराव नांदेडकर,मुख्य उपाध्यक्ष तथा विश्वासु प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष ,मा.शिवाजी पांगरेकरजिल्हा सचिव, मा.बालजिराव घुमलवाड युवा कोअर कमेटी अध्यक्ष,मा.लक्ष्मणराव विभुते,युवाजिल्हाध्यक्ष,मा.संदिप अवनुरे ,युवा जिल्हा सचिव,मा.लक्ष्मणराव मरकंटे
सल्लागार मा.बालाजिराव तेलंग,सल्लागार मा.रमेशराव घुमलवाड
जिल्हा उपाध्यक्ष मा.बालजीराव पाशावार जिल्हा संघटक मा.भागवत कापसिकरजिल्हा संघटक मा.काळेश्वर देवडे सोशल मिडिया जिल्हा प्रमुख मा.साईनाथ राजरवाड सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.बाबु देवडे लोहा तालुका अध्यक्ष मा.सोनु आरेपलु,सोशल मिडिया मुदखेड ता अध्यक्ष मा हणमंत कानगुले नांदेड ता.उपाध्यक्ष मा.शंकरराव गोरडवार,सल्लागार मा.लवकुश अवनुरे,सामाजिक कार्यकर्ता मा.शिवाजी तेलंग,सामाजिक कार्यकर्ता व ईतर मान्यवरांचा स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेच्या वतिने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मार्गदर्शन पर भाषण मा.लक्ष्मणराव विभुते,मा बालजिराव घुमलवाड,मा शिवाजी पांगरेकर,मा.शंकरराव नांदेडकर, मा.विजयराव देवडे लहानकर,मा पुंडलिकराव घुमलवाड आणि शेवटि अध्यक्षीय समारोप – मा आमदार मोहनरावजी आन्ना हंबर्डे यांनी केला.
तत्पुर्वी जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यानी आमदार साहेबानां नांदेड जिल्ह्यात किति कुंभार समाज आहे ते अवगत करुन दिले आणि समाज गरिब असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मागसलेला आहे म्हणुन जिल्ह्यातील गरिब विद्यार्थांना नांदेड शहरात राहुन शिक्षण घेता यावे या साठी त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था होणे गरजेचे असल्यामुळे नियोजित जागेत काकांच मंदिर व भव्य वस्तिगृह व्हावे या साठी संघटना धडपड करित असल्या बदल सांगितले व आपल्याकडुन कुंभार समाजाला खुप अपेक्षा आहेत.त्यामुळे आपण लक्ष घालण्याची विनंती आपल्या भाषनात केली.
तसेच मा.शंकरराव नांदेडकर यांनी मा.नांदेड दक्षिण आमदार मोहनरावजी आन्ना हंबर्डे यांना लवकरात लवकर 20,00000 विस लाख रु निधि देऊन व समाजातिल अडचणी वर काय विविध सुविधा व उपाय योजना करता येतील यावर मार्गदर्शन केले.मा.आमदार मोहनरावजी आन्ना हंबर्डे यांच्यावर शब्द सुमनाने वर्षाव केला समाजाच्या वतीने मा.आमदार मोहनरावजी आन्ना हंबर्डे यांनी निधि जाहिर केल्या बद्धल मा.शंकरराव नांदेडकर यांनी धन्यवाद व आभार मानले
अध्यक्षीय समारोपात आमदार साहेबानी तुमच्या समाजाच्या सहाकार्यानेच महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात गेलो असल्याने मि तुमच्या समाजाच्या अडचणि सोडविण्यास कटिबध् असल्याचे सांगितले.

तुम्ही मंदिर बांधा वस्तिगृह बांधा पैशाची कमि पडु देणार नाही.असे ठनकाउन सांगितले मागिल कार्यक्रमात दहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते परंतु आज प्रत्यक्षात मंदिराच्या नियोजित जागेत आल्यानंतर त्यानां समजलं कि दहा लाखात काही भागनार नाही म्हणुन त्यानी न मागता आज भाषनात विस लाख रुपये देत असल्याचे जाहिर केले येत्या दोन महिण्यात निधी दिला जाईल तुम्ही कामाला लागा असे संघटनेच्या पदाधिकार्‍यानां सांगितले आणि जोरदार टाळ्याच्या आवाजात साहेबांचे समाजाने आभार व्यक्त केले.
तेंव्हा साहेबानी तुमच्या समाजाच्या अडचणि मला सांगा मि निश्चित सोडविन असे ठामपणे सांगितले.आणि असेच सामाजिक निस्वार्थी कार्य करत रहा मि तुमच्या सदैव सोबत आहे असे सागुन कार्यक्रमाला बोलवल्या बध्दल संघटनेचे मनापासून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाची संकल्पना आणि सुत्रसंचलन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल जिल्हा सचिव शिवाजी पांगरेकर यांचा
मा.आमदार साहेबानी शाल श्रीफळ व पुष्पहार देउन स्वागत केले.आभार प्रदर्शन प्रा.नांदेडकर सर यानी केले.
-कार्यक्रमाचे आयोजन मा लक्ष्मणराव विभुतेमा.संदिप अवनुरे
या दोघानी केलं त्यांचे सुध्दा अभिनंदन केलं.कार्यक्रम संपल्यानंतर
महाप्रसाद म्हणजे जेवन करुनच सर्वानी निरोप घेतला.

त्या नंतर जिल्हा मुख्य उपाध्यक्ष मा शंकरराव नांदेडकर यानी काकांच्या पुण्यतिथी निमित्त गुरद्वाराच्या बाजुला गरिब लोकानां अन्नदान वाटप जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे जिल्हा सचिव शिवाजी पांगरेकर व जिल्हा संघटक बालाजि पाशावार यांच्या हस्ते केलं त्यांच सुध्दा कराव तेवढं कौतुक कमि आहे.

एकंदरित कार्यक्रम खुप म्हणजे खुपच छान झाला त्याचे शब्दात वर्नण करता येणं शक्य नाही.
लॉकडाउन आहे कोरोना आहे कार्यक्रम नको घरिच पुण्यतिथी साजरी करा असे काहिजन म्हणाले फोनहि आले परंतु कोरोनाचे नियम पाळुनच कार्यक्रम संपन्न झाला संघटना प्रत्यक्षात कार्य करते हे मि ठामपणे सांगु ईच्छुतो.फक्त कार्य करत राहणे हेच आमच्या संघटनेचे ध्येय आहे.प्रत्येकवेळी काहि तरि वेगळं करण्याचा प्रयत्न राहतो.आणि या नंतर फक्त आणि फक्त मिशन काकांच मंदिर व वस्तिगृह हेच ध्येय असणार आहे.संघटनेचं म्हणुन जिल्ह्यातील सर्व कुंभार समाज बांधवानी या कामास सहकार्य करावं व संघटनेत सामिल होउन संघटना मजबुत करावी.

168 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.