किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत जाहीर

नांदेड/प्रतिनिधी:

नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन 2021/ 22 या शैक्षणिक वर्षातील दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत जाहीर करण्यात आल्याचे दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड जिल्हा परिषद हे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सध्या राज्यात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वरील प्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या देण्यात आले आहेत.
प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर याला सोडून इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या अनुज्ञेय नाहीत. मात्र सुट्टीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टी असतील त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहतील.या कालावधीमध्ये खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये वर दिलेल्या अटी च्या अधीन राहून शाळेच्या सुट्टीचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा. या अटी चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी. अशा प्रकारचे परिपत्रक नांदेड शिक्षणाधिकारी मा.विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी काढले आहे.

214 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.