किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कुंडलवाडी पोलीसांनी नागणी रोडवर ५७ किलो गांजासह ८ लाखाचा मुद्देमाल पकडला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.26.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील कुंडलवाडी येथून जवळच असलेल्या तेलंगना सिमा लगत असलेल्या नागणी रोडवर सद्या देगलुर-बिलोलीची विधानसभा पोटनिवडणुक येत्या दि.३० ऑक्टोंबर रोजी पार पडत असल्याने कुंडलवाडी पोलीसांनी वाहनाची तपासणी सुरु केली.

यावेळी मानवाच्या मज्या संस्थेवर परीणाम करणारा आमली मादक पदार्थ गांजा अवैधरीत्या बाळगून वाहतुक करीत असताना आढळून आला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी ५७ किलो.५६७ ग्रँम गांजा,स्विफ्ट डिझायर गाडी आणी दोन मोबाईल असा ८ लक्ष ३४ हजार १०३ रुपयाचं मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तेलंगना सिमा लगत असलेल्या नागणी रोडवर देगलुर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक निमित्त तपासणी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान स्वीफ्ट डीझायर कार क्र.एम.एच.-०६-एझेड-५३८५ या गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनात ५७ किलो ५६७ ग्रँम गांजाचे दोन बॉक्स आढळुन आल्याने वाहनामधील १) फेरोज अब्दूल पठाण वय २९ वर्षे सातोवनकर गल्ली रा.परतुर,२) सयद गौस सयद शिदीक वय ३५ वर्षे तलाब कट्टा भवानीनगर चारमिनार हैद्राबाद ह.मु.रा.नुरकॉलनी रा.परतुर,३) शेख रीयाना बेगम शेख असिफ हुसेन वय ५५ वर्षे रा.नुरकॉलनी सर्व राहणार परतुर जिल्हा जालना येथील तीन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेचा अधिक तपास करून त्यांच्याकडून ५७ किलो.५६७ ग्रँम गांजा,दोन मोबाईल,स्वीफ्ट डीझायर वाहन यांची एकुण किंमत ८३४१०३ रूपयांचे मुद्देमालसह आरोपींना ताब्यात घेऊन कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहीती सपोनी के.एस.पठाण यांनी दिली.

गु.र.नं.१३४/२०२१,कलम २० ( बी), (सी), २२ एनडीपीएस अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे नांदेड,विजय कबाडे अप्पर पोलीस अधिक्षक भोकर,सचिन सांगळे उपविभागीय अधिकारी देगलुर,विक्रांत गायकवाड उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,पोहेकॉ आडे,माकुरवार,चव्हाण,चापलवार,कमलाकर आदी सहभाग होते

765 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.