किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सहृदयी पोलीस अधिकारी मंदार नाईक ;आपली पदोन्नती पोलीस उपअधीक्षक पदी झाल्या प्रीत्यर्थ मनःपूर्वक अभिनंदन !

✍️(C.) : डाॅ.वसंत भा.राठोड, किनवट.
———————–
प्रशासकीय सेवेत कार्य करणारे अनेक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांची कार्य करण्याची हातोटी वेगवेगळी असते. काही अधिकारी सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे असतात. अशा कर्तव्यपरायण अधिकाऱ्यांचे कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहतात. असेच एक किनवट तालुक्याला लाभलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे मंदार नाईक साहेब हे होत.
उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून नाईक साहेबांचा किनवट तालुक्यातील सेवाकाळ अतिशय सेवाभावी राहिला. साहेबांनी प्रशासकीय सेवा आणि सामाजिक सुव्यवस्था याला एका सूत्रात बांधण्याचे महतप्रयास केले.

महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर असणाऱ्या नांदेड जिल्ह्य़ातील किनवट म्हणजे, अतिशय दुर्गम असा घनघोर वनराईने, डोंगर दरीने व्यापलेला आदिवासी तालुका आहे. अशा या पहाडी डोंगर दर्यात ते दोन अडीच वर्ष रममाण झाले. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांनी अख्खा तालुका, डोंगर दर्रे, तांडा पोडा, गाव गुडा, नदी तळे इत्यादी निसर्ग स्थळे पिंजून काढली. अशा अनेक ठिकाणी आस्तेवाईकपणे भेटी दिल्या.
साहेबांचे लोकोपयोगी कार्य किनवट वासीयांच्या निरंतर आठवणीत राहतील . त्यांनी भरविलेले महिलांचे मेळावे. महिला सबलीकरणासाठी संवाद व भाऊबीज कार्यक्रम, पंचायत समिती ,पोलीस स्टेशन, इतर गावो गावी, गुडा, पोडा, तांड्यात जाऊन संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कित्येक कार्यक्रमात मी जातीने त्यांच्या सोबत होतो.

पोलीस रेझिंग डे, सामाजिक न्याय पंधरवाडा, जागतिक महिला दिन, गोरबंजारा होळीतील लेंगी महोत्सव मार्च – २०१९ ,
पक्षी संवर्धन पंधरवाडा, कोरोना जनजागृती मे – २०२०, विविध दक्षता संमेलन अशा अनेक कार्यक्रमात मी मा. साहेबांच्या सूचनेनुसार सहभाग नोंदविला. त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला लाभले.
माझ्या वेगवेळ्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांनी प्रशस्तीपत्र देऊन माझा गौरव केला. आमच्या शाळेतील (सरस विद्यालय मांडवी) २०१९ च्या स्नेह संमेलनात ते प्रमुख अतिथी म्हणून आले होते. शाळेच्या वतीने त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला.
किनवट, अंजनखेड, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील महिला सुरक्षा संबंधी वक्तृत्व स्पर्धा, पैनगंगा अभयारण्यातील पक्षी संवर्धन संमेलन असे अनेक कार्यक्रम त्यांच्या उत्कृष्ट उत्कर्ष कार्याची पावती देतात. अशा बहुआयामी कार्यक्रमाचे साक्षीदार मला होता आले.
पोलीस खाते हे एक अतिशय संवेदनशील खाते म्हणून ओळखल्या जाते. अशा संवेदनशील खात्यात आपण प्रशासनिक व सामाजिक बांधिलकी जपलात किंबहुना चांगली सांगड घातलात. आपल्या चांगल्या सेवेची पावती म्हणजेच आपली आजची झालेली पदोन्नती होय.


*” सद रक्षणाय खल निग्रहणाय “*
हे महाराष्ट्र पोलीस सेवेचे ब्रीदवाक्य आहे . अर्थात,” महाराष्ट्र पोलीस सत्याचे व सज्जनांचे रक्षण करण्यास कटीबध्द असून दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास वचनबद्ध आहेत.”
पोलीस सेवेचे हे ब्रीद आपण खरोखरच सार्थकी लावलात. या आदिवासी डोंगराळ भागातील लोकांची सेवा जेवढी करता येईल तेवढी केलात. कोरोना सारख्या महासंकटात आपल्या पोलीस गाडीला भोंगे लावून प्रतिबंधात्मक जनजागृती केलात. गरीब, पिडीत, दिन दलित लोकांना धान्यांचे व गृहोपयोगी वस्तुचे किट वाटप केलात. आज आपल्या परिश्रमाचे व सेवाभावी कार्याचे साफल्य झाले.
एकंदरीत आपल्या उत्कृष्ट सेवाकार्याची परिणीती म्हणजे आपली झालेली पदोन्नती होय. आज घडीला आपण पदोन्नती घेऊन मुंबई सारख्या राजधानीच्या महानगरात जात आहात. ही बाब आपल्या सहित तमाम सर्वांना हर्षित करणारी आहे.
आज दि. २३\०९\२०२१, गुरुवार रोजी आपण सौ. कविता नाईक मॅडमजींच्या समवेत सपत्नीक माझ्या परिवारास भेट देऊन आमचा आनंद द्विगुणित केलात. हा आपल्या मनाचा थोरपणा आहे.
मा. नाईक साहेब आपले शासन, प्रशासन सेवेतील कार्य उज्ज्वल आणि उन्नत होवो. आपणास निरोगी, निरामय, आयुरारोग्य लाभो ही मनस्वी सदिच्छा व्यक्त करतो.
पुनश्चः आपले अभिनंदन आणि पुढील सेवाकार्यास हार्दिक शुभेच्छा !

*शब्दांकन : डाॅ. वसंत भा.राठोड, किनवट.*
मो. नं. : 9420315409, 8411919665.
———————————————————–

91 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.