राजकुंवर महिला महाविद्यालय किनवट येथे सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन संपन्न झाले
किनवट/ प्रतिनिधी.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त संविधान दिन महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आवाजात संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले.
कोरोना संक्रमणाचे सर्व प्रोटोकॉल पालन करत मास्क, सेनिटाईझर तसेच सुरक्षित अंतर ठेवत प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थिनी यांनी सामूहिक आवाजात संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
संविधान प्रास्ताविका वाचन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भगवान सिंग डोभाळ व प्रा.डॉ.संगीता राजपूत यांनी ऑनलाईन संविधान प्रास्ताविक वाचण्यात सहभाग नोंदवला या प्रसंगी महाविद्यालयाचे सल्लागार सुनील येरेकार,प्रभारी प्राचार्य विनोद घुगे,प्रा.गिरभिडे मॅडम,प्रा.पुनम मॅडम,प्रा.कदम मॅडम,श्री संम्यक मुनेश्वर सर,श्री राजपूत सर, रविना मॅडम,अविनाश निमराज यांच्या उपस्थितीने कार्यक्रम संपन्न झाला.