राजेश्वर कांबळे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी, कंधार
—————–
येथील पत्रकार राजेश्वर कांबळे यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ता.उमरी जि.नांदेडच्या वतीने प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार तैवानचे भंते श्रद्धारख्खिता यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ता.उमरी जि.नांदेडच्या वतीने सोमवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मौजे बितनाळ, (ता.उमरी) येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जाधव ए.एस हे होते. उद्घाटक एम.सायल्लू म्हेसेकर, स्वागताध्यक्ष नगरसेवक ईश्वर सवई, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.रामकृष्ण बदने, नगरसेवक सोनू वाघमारे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य महासचिव पांडूरंग कोकुलवार, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक बी.एस.सरोदे, भारतीय बौद्ध महासभेचे उमरी तालुकाध्यक्ष भिमराव वाघमारे, साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे, प्रो.डॉ.गंगाधर तोगरे, साहित्यिक दत्ताहरी कदम, प्रतिष्ठानचे सचिव नागोराव डोंगरे, बितनाळचे सरपंच मारोती वाघमारे, उपसरपंच देविदास अक्ललवाड, चेरमन मारोती उमाटे, पोलीस पाटील संतराम डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, धर्माबादचे पत्रकार लक्ष्मण तुरेराव, गंगाधर धडेकर, शिक्षक अनिल गायकांबळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पत्रकार राजेश्वर कांबळे यांना सन २०२० या वर्षाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तैवानचे भंते श्रद्धारख्खिता यांच्या हस्ते राजेश्वर कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक, शाल, पुष्पहार व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
राजेश्वर कांबळे हे कंधार मधील नामांकित पत्रकार आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. तळागाळातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांवर परखडपणे लिखाण केले आहे. फक्त तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये निःपक्ष, निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून राजेश्वर कांबळे यांची ओळख आहे. त्यांच्या अनेक बातम्या गाजल्या आहेत. त्याच्या प्रत्येक बातमीला वाचकांकडून मोठी पसंती मिळते. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कोरोना संकटकाळात गरजूंना मदत केली आहे. विविध संघटनेची महत्वपूर्ण पदे भुषविले आहेत. त्यांच्या जीवन कार्यावर नऊ लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांना एक आंतरराष्ट्रीय, दोन राज्यस्तरीय पुरस्कारांसह इतर तीन पुरस्कार मिळाले आहेत. हा पुरस्कार राजेश्वर कांबळे यांनी आजी का.नागरबाई कांबळे यांना समर्पित केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.