अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या..जिल्हा काँग्रेस
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.३०.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात अवकाळी पाउस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री #अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशनुसार जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले.*
जिल्ह्यात दि.27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या पावसासोबत काही ठिकाणी गारपीट झाली.
यात फळबाग,फुलबाग,केळी,हळद, ऊस,चिकू,पपई व अन्य पिकाचे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा हवालदिल झाला आहे.
वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याबाबत संबंधितांस सूचित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास उपकृत करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली.
यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर,वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मीनल पाटील खतगावकर,माजी सभापती किशोर स्वामी,महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रेखाताई चव्हाण,अ.जा.जिल्हाध्यक्ष मनोहर पवार,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे,लोह्याचे तालुकाध्यक्ष शरद पवार,कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे,सुभाष पाटील दापकेकर,नवल पोकर्णा,बालाजी गव्हाणे,विक्की राऊतखेडकर,किशोर पाटील रुईकर,शिवाजीराव पवार,अमोल डोंगरे,आनंद भंडारे,बालाजी कदम,राजू शेट्टे,दत्तात्रय सूर्यवंशी,बालाजी बद्देवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.