किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ई- पीक पहाणी अत्यंत क्लिष्ट असुन त्यामुळे शेतक-यांना पीक पेरा नोंदवुन घेण्याकरिता अत्यंत समस्यांचा करावा लागत आहे सामना

किनवट ता प्र दि १४ शासनाने शेतक-यांच्या शेतामध्ये काय पेरले आहे हे नोंदवुन घेण्यासाठी ई-पीक पाहणी हे मोबाईल वरील अप्लिकेशन काढले आहे जे कि अत्यंत क्लिष्ट असुन त्यामुळे शेतक-यांना पीक पेरा नोंदवुन घेण्याकरिता अत्यंत समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मुळात जि.पी.एस तंत्रज्ञानावर आधारी या पध्दतीमध्ये थेट बांधावर उभे राहुण पिक पाहणी नोंदवायची आहे, ज्यामुळे शेतातील पिकाचे छायाचित्र व शेतीचे पिन पॉइंट लोकेशन या ऍपलिकेशन च्या माध्यमातुन नोंदवले जाणार आहे. परंतु शासनाचा शेतीविषयक एवढा फौजफाटा असतांना देखिल शेतक-यांना माहीतीच्या अभावाने अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबत राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रतिक्रीया प्राप्त होत असुन नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या विदर्भ विभागात शेतक-यांच्या बांधावर तलाठी व सक्षम प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी स्वतः जाऊन शेतक-यांना ई-पीक पाहणी या ऍप मध्ये माहीती कशी नोंदवावी हि माहिती शेतक-यांना देतांना निदर्शनास येत आहे तर नांदेड जिल्ह्यातील व किनवट तालुक्यातील तलाठी किंवा शेतक-यांच्या करिता असलेली तत्सम यंत्रणा हि कुंभकर्णी झोपेत असल्याने शेतक-यांची एका ठीकानावरुन दुस-या ठीकाणी माहितीच्या अभावाने फरफट होत आहे.
तरी किनवट तालुक्यातील शेतक-यांच्या बांधावर थेट शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी नोंदवण्या विषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ती व्यवस्था शासनाने करावी अन्यथा शेतक-यांमध्ये प्रशासना विषयी तिव्र नाराजी निर्माण होत आहे.
तसेच ज्या ज्या शेतक-याकडे ई-पीक पाहणी नोंदवण्याकरिता अड्रॉईड मोबाईल व इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नाही अशा शेतक-यांना शासनाच्या विविध योजनेतुन मोबाईल उपलब्ध करुन देण्यात यावे अशी हि मागणी जोरधरु लागली आहे.

164 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.