किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सचिन नाईक यांनी दिपावली सणानिमित्त बोथ तांडा येथील निवासस्थानी केले स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

किनवट ता.(प्रतिनिधी) : शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन नाईक यांनी दिपावली सणानिमित्त त्यांच्या बोथ तांडा(परसरामनाईक तांडा) येथील निवासस्थानी आयोजित केला होता.याप्रसंगी सदरील कार्यक्रम कोरोनानियमाचे पालन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम यांच्यासह विविध पक्षाचे नेते,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन नाईक हे दरवर्षीच दिपावली सणानिमित्त त्यांच्या परसराम नाईक तांडा येथील राहत्या गावी भव्य स्वरूपात स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करून जनतेशी असलेले ऋणानुबंध जोपासत असतात. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या कार्यक्रमाला खंड देण्यात आला होता. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर परंपरेप्रमाणे सचिन नाईक यांनी 6 नोव्हेंबर रोजी स्नेह मिलनाचा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला आ. भीमराव केराम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, काँग्रेसचे निरंजन केशवे,शिवसेनेचे राम बुळे पाटील, काँग्रेसचे प्रेमील जाधव (नाईक),भाजपाचे नेते धरमसिंग राठोड, सुमित राठोड, नवीन राठोड, एड उदय चव्हाण, शंकर राठोड,खा हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनील गरड अशा वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मांदियाळी दिसून आली. या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या छोटेखानी सभेत बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की, दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येणारा महत्त्वाचा सण आहे या शुभमुहूर्तावर आयोजित केलेला स्नेह मिलनाचा कार्यक्रम खरोखरच एकमेकाशी ऋणानुबंध जोपासणारा आहे. यानिमित्त दुभंगलेली मने जुळून येतात, माणसाचे माणसाप्रती असलेला जिव्हाळा प्रदर्शित होतो सचिन नाइके शिवसेनेचे असले तरी त्यांचे कार्य सर्वसमावेशक असते अशा शब्दात त्यांनी यांनी सचिन नाईक प्रशंसा केली. तसेच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन केले. जि प चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी त्यांच्या भाषणातून सचिन नाईकांच्या सामाजिक कार्याचे दाखले देत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्व मिळून काम करू असे सांगितले तर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकाशी चर्चा, संवाद,विचारांची देवाण-घेवाण होऊन आपुलकीचे नाते निर्माण होत असते. सुख दुखा प्रसंगी धावून येण्याची प्रेरणा मिळत असते सचिन नाईकांचा हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम एक प्रकारे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा मेळावा असून या मेळाव्यात एकमेकाप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व माणुसकीचा शिदोरी घेऊन जावी असे मत काँग्रेस नेते निरंजन केशवे यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नेते, कार्यकर्ते व हितचिंतकांना विधानसभा संघटक सचिन नाईक यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम जाधव यांनी केले या कार्यक्रमाला बालाजी बामणे, आशिष राठोड, बंटी पाटील, अंकुश जाधव, चिंतामण राठोड, साहेबराव जाधव, गजानन यादव, नितीन मोहरे, राजू पाटील साळुंखे, नवीन जाधव, सुनील राठोड, महावीर आडे.यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते,पत्रकार व त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

548 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.