राम मंदीरात दि.०३ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संघटन मंत्री श्रीरंगजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा
किनवट (ता. प्र .) शहरातील राम मंदीरात दि. ०३ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संघटन मंत्री श्रीरंगजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
श्रीरंगजी राजे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, १९६४ पुर्वी देशात अस्पर्शता पद्धत होती . ती नष्ट करण्यासाठी व सर्व जाती धर्मियांनी संघटीत राहावे यासाठी सर्व साधु संतानी मिळून १९६४ रोजी मुंबई येथे विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली . त्याचा आज आपण ५७ वा वर्धापण दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत .
यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मच्छेरलावार ,विभाग मंत्री अनिरुद्र केंद्रे , जिल्हा मंत्री किरण बिच्चेवार, राम मंदीर ट्रष्ट चे अध्यक्ष व्यंकटराव सातुरवार, व्यंकट भातनासे, राजू कलकुंटलावार, किरण ठाकरे, शिवराज चाडावार, स्वागत आयनेनिवार, रामकिशन केंद्रे, देवराव एंन्डलवार, प्रशांत काकडे, शुभम कोकलवार, विठ्ठल म्याकलवार, केशव लांडगे, चंद्रशेखर नेम्मानीवार, गोविंद चव्हाण, गणेश शर्मा, कृष्णा कलकुंटलावार, प्रमोद कुरपटवार, विक्रांत दुगेलवार, रजनिकांत राईचवार, किशोर बोलेनवार, राकेश तुम्मलवार, विनायक ठोंबरे, विकास जाधव, विमश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.