छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपा नेत्यांचा निषेध करून जाेडेमाराे आंदाेलनसंपन्न
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.21.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध व जाेडेमाराे आंदाेलन,तसेच महाराष्ट्राची कन्या श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आराेपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता आयटीआय कॉर्नर भागातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात धरणे आंदाेलन करण्यात आले आहे. तसेच श्रद्धा वालकर हिस यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.सदरील आंदोलन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री.मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
या धरणे आंदाेलनात आणि श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाला काॅंग्रेसचे सर्व आजी- माजी खासदार,आमदार,शहराध्यक्ष व पदाधिकारी,जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक,पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य,सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांनी आपली उपस्थितीथी होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत,आ. माेहनअण्णा हंबर्डे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यासह तालुका अध्यक्ष अॅड.निलेश पावडे, ब्लॉक अध्यक्ष किशाेर स्वामी, विनाेद कांचनगिरे,कार्याध्यक्ष किशन कल्याणकर,रहिम अहेमद खान,सुरेश हाटकर,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साै. कविता कळसकर,शहराध्यक्ष साै. अनुजा तेहरा,युवक काँग्रेसचे तिरुपती काेंढेकर,शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पावडे,भोकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष माराेती पाटील शंखतीर्थकर,एन एस.यु.आय जिल्हाध्यक्ष शशीकांत क्षीरसागर,सोशल मीडीया जिल्हाध्यक्ष सुखानंद पुरी,सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इजिं.हरजिंदर सिंघ संथू यांनी केले आहे.