आंबडी ते पिंपळगाव फाटा या रस्त्यावर पिंपळगाव घाटात ट्रक पलटी.
किनवट: आंबडी ते पिंपळगाव फाटा या रस्त्यावर पिंपळगाव घाटात सकाळी 11 ते 11.30 च्या दरम्यान ट्रक क्र. HR-55 K-4397 पलटी झाला आहे.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घाटातून बरेच वाहने सुसाट वेगाने जात -येत असतात हा ट्रक कसा पलटी झाला याचे कारण समजू शकले नाही परंतु हा ट्रक रोडच्या डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे ट्रक चे नुकसान झाले परंतु जीवित हानी झाली झालेली नाही. जर हा ट्रक उजव्या बाजूला पलटी झाला असता तर तो खोल खाली खाईतच गेला असता व मोठी हानी झाली असती. या वळणाच्या रस्त्याने वाहने हळू चालवणे गरजेचे आहे. यापूर्वी ही पिंपळगाव घाटात व अंबाडी घाटात अनेक वाहने पलटी झालेले आहेत. सदरील घाट हा अरुंद असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. तसेच पावसामुळे बाजूच्या सर्व साईड पट्ट्या वाहून गेल्या आहेत.त्या मुळे दोन वाहने येथे पास होत नाहीत.सदरील घाट फोडून रुंदीकरण करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील जनतेतून होत आहे. लोकप्रतिनिधीनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.