किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, आदर्श आचारसंहिता पाळावी व मतदानाचा हक्क बजावावा -निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे)

किनवट : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 चा कार्यक्रम मंगळवारी (ता. 15/10/2024 ) झाहीर झाला असून यात तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नियोजन प्रमाणे निवडणूक घेण्याची आमची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावे आणि मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.

        निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , माहूरचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव , उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , रामेश्वर मुंडे व मीडिया कक्षाचे सहायक उत्तम कानिंदे उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी अशी माहिती दिली की , 83-किनवट विधानसभा मतदारसंघात  एकूण 331 मतदान केंद्रे असून 2,77,203 मतदार असुन त्यापैकी पुरुष मतदार संख्या 1,41,678 एवढी, स्त्री मतदार संख्या 1,35,514 एवढी व तृतीय पंथी संख्या 11 अशी संख्या आहे.
       आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसारः दिनांक 22/10/2024 (मंगळवार) ही निवडणुकीच्या अधिसूचनेची तारीख असेल. दिनांक 29/10/2024 (मंगळवार) ही उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. दिनांक 30/10/2024 (बुधवार) ही छाननीची तारीख असेल.दिनांक 4/11/2024 (सोमवार) ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. किनवट मतदारसंघात दिनांक 20/11/2024 (बुधवार) रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी दिनांक 23/11/2024 (शनिवार) रोजी होणार आहे.
           तेव्हा सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. उपस्थितांचे आभार मानून  त्यांनी पत्रकार बंधूना विनंती केली की,  निवडणुकीशी संबंधित बातम्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात.

115 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.