*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुका अध्यक्षपदी पत्रकार श्री शिवराज पवार यांची फेर निवड*
लोहा: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुका अध्यक्षपदी दैनिक हिंदू सम्राट व दैनिक वतनवाला या वृत्तपत्राचे पत्रकार श्री शिवराज पवार यांची चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.*
श्री शिवराज पवार पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
*श्री शिवराज पवार यांचा परिचय*
नांव-शिवराज पांडुरंग पा.पवार
*शैक्षणिक अर्हता*
एम. ए. मराठी, एम. ए. इतिहास, बी.ए्ड., बी. लीब.,जी.डी. सी. & ए.
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी २०२०- २१ पासून आजतागायत सलग तिसऱ्यांदा जबाबदारी पेलली*
*आता सलग चौथ्यांदा लोहा तालुकाध्यक्षपदी निवड*
नेहरू युवा केंद्र नांदेड कडून
*राष्ट्रीय सेवा कर्मी* म्हणून २००३ ते २००५ दरम्यान लोहा तालुका कार्यक्षेत्रात विविध शिबिरे,सामाजिक उपक्रम, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन.
*लोहा न्यायालयाकडून विधी सेवा प्राधिकरण लोहा सदस्य* /पैरालिगल व्हालिएंटीयर म्हणून सन २००४ ते २००६
*स्वयंशिक्षण प्रयोग नांदेड*
लोहा तालुका समन्वयक पदी
२०१० ते २०१४ पर्यंत कृषी, सौरऊर्जा, महिला बचत गट संदर्भात प्रशिक्षण
*लोहा पंचायत समिती* जीवनोन्नती अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिला बचतगटांना तालुका भरात प्रशिक्षण देणे. सन २००८ ते २०११ या कालावधीत.
*पत्रकारितेत पदार्पण व कार्य-*
सन- २००३ पासून वर्तमानपत्रात सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विविध दृष्टिकोनातून लेख प्रकाशित
सन २०१६-१७ पासून आजतागायत सक्रिय पणे कार्यरत
*पोर्टल -*
दै.स्वराज्य २४ तास (उपजिल्हा प्रतिनिधी) , राजमुद्रा न्यूज लाईव्ह (तालुका प्रतिनिधी) ,महा-२४ न्यूज (तालुका प्रतिनिधी)
*वर्तमानपत्र -*
दैनिक हिंदू सम्राट (तालुका प्रतिनिधी)
दैनिक वतनवाला (तालुका प्रतिनिधी)
*लेखन :-*
सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, धार्मिक, राजकीय यांसह विविध विषयांवर
*साक्षर भारत अभियान-२०११* पासून गुणवत्तेच्या आधारावर प्रेरक म्हणून निवड व सन २०१८ पर्यंत ग्रामलोकशिक्षण समिती पारडी येथे कार्यरत.
या कालावधीत महाराष्ट्र राज्य बहुजन साक्षर भारत प्रेरक संघटनेत तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष विविध पदांवर कार्य
तहसील कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेवर मोर्चे/धरणे/आंदोलने, प्रौढ शिक्षण संचालक कार्यालय पुणे मोर्चे-३, हिवाळी अधिवेशन नागपुर मोर्चे-३, मुंबई आझाद मैदान धरणे आंदोलन ४, वेळा, संसद भवन नवी दिल्ली मोर्चे सलग ३ वेळा काढून राज्यभरातील प्रेरकांना न्याय दिला.
श्री शिवराज पवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.