किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते , नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा -अनिल महामुने

किनवट : बुद्धिबळ खेळणं हे मनाला तीक्ष्ण करते, यामुळे आय क्यू ( IQ ) पातळी सुधारते. याशिवाय या खेळातून शिकण्याची क्षमताही झपाट्याने विकसित होते. बुद्धिबळ हा मेंदूच्या व्यायामासाठी एक उत्तम खेळ आहे. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे नैराश्य आणि चिंता यांचा धोका कमी होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावाच तसेच आपल्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळवावे. सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिकचे सामने सुद्धा पाहून आपली खेळ भावना जागृत करावी , असेअसे प्रतिपादन पीएम पोषण शक्ती निर्माण योजना किनवटचे अधीक्षक अनिल महामुने यांनी केले
       येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे , एम. के. टी.चे प्राचार्य एस. व्ही. रमणराव व  राष्ट्रीय कोच तथा तालुका क्रीडा संयोजक संदीप यशिमोड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
          2 ऑगष्ट ते 10 सप्टेबर 2024 या कालावधीत होणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन बुद्धीबळ खेळाने झालं. यास्पर्धेसाठी सुमेध भवरे व प्रमोद भवरे पंच होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संयोजक यशिमोड यांनी तातुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांचा सहकार्याने या स्पर्धांचं आयोजन केलं आहे.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील यशवंत या प्रमाणे : 14 वर्षाआतील मुले : प्रथम-विरोचन घनश्याम कोवे, द्वितीय-आयुष प्रशांत पाटील,तृतीय-सात्विक मारोती गुट्‌टे , चतुर्थ-सय्यद उमर सय्यद अलिमोदीन , पंचम-सिद्धार्थ आत्माराम राठोड ,
14 वर्षाआतील मुली : प्रथम-पंकजा बालाजी नागरगोजे, द्वितीय-सांची लक्ष्मण भवरे, तृतीय-भार्गवी भगवानराव माने, चतुर्थ-दिधिती विकास सुंकरवार, पंचम-प्रचेता प्रमोद येरेकर
17 वर्षाआतील मुले : प्रथम-हर्षल प्रेमअमर तांदळे (एमकेटी इंग्लिश स्कूल कोठारी (चि) ), द्वितीय-वीर बालाजी नागरगोजे, तृतीय-देवराज देविदास चोपडे, चतुर्थ-गोपाल विजय दांडेकर, पंचम-सुबोध विनय वैरागडे
17 वर्षाआतील मुली : प्रथम-प्राची प्रल्हाद सावते (एमकेटी इंग्लिश स्कूल कोठारी (चि) ), द्वितीय-काव्या सुखदेव डोंगरे, तृतीय-पूर्वी गोविंद खोत, चतुर्थ-रिद्धी शंकर सामला, पंचम-समृद्धी प्रदीप गोवंदे

128 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.