किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

38 दिवसा नंतर पो.स्टे. किनवट येथील गुंतागुतीचा खुनाचा उलघडा करुन तिन आरोपी ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

किनवट: दिनांक 14/10/2023 रोजी रात्री 10.19 ते 10.41 वाजताचे सुमारास किनवट येथील सामाजीक कार्यकर्ता सुरेश दत्तात्रय मस्के वय 50 वर्षे रा. हमालकॉलनी किनवट हे त्यांचे राहते घरुन पत्नीला दवाखाण्यातून आणण्यासाठी माहेर हॉस्पीटल कडे जात असतांना हमालकॉलनी जवळील मजीद जवळ कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणासाठी अज्ञात हात्याराने डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला होता. त्यावरुन त्यांची पत्नी स्नेहा सुरेश मस्के यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. किनवट येथे गुरन 245/2023 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा घडुन एक महीन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी सदरचे गुन्हयाचा काहीएक उलगडा होत नसल्या कारणाने मा. पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी स्थागुशा येथील दत्तात्रय काळे यांचे टिमला दिनांक 16/11/2023 रोजी आदेश दिले होते.
सदर पथकाने पो.स्टे. किनवट येथे जावुन सतत सहा दिवस कॅम्प करुन व किनवट येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे मदतीने सदर गुन्हयाचा बारकाईने सखोल तपास चालू केला. त्यात साक्षीदार, घटनास्थळा शेजारील साक्षीदार, तांत्रीक मदत, किनवट शहरात गोपनीय माहीतगार, मयताचे सदर भागात असलले भांडणाचे कारण असे वेगवेळया पध्दीतीने बौध्दीक कौशल्य वापरुन खुनातील अज्ञात आरोपीचा सतत शोध केला.
दिनांक 21/11/2023 रोजी पथकीतल अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती प्रमाण इसम नामे शेख रिहान पि. शेख रहीम वय 17 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हमलाकॉलनी किनवट यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्यांने व त्याचे दोन साधादार यांनी मिळुन यातील मयत सुरेश मस्के हा शेख रिहान याचे वडीला सोबत भांडणे करुन वडीलावर खोटी केस करण्यास लावले होते तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता. तसेच कॉलनी मध्ये दादागीरी मध्ये वावरत होता त्यावरुन त्याने व त्याचे पाहुण्याचे मुलगा नामे शेख आवेज ऊर्फ अबु पि. शेख शादुल्ला वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी व शेख अशपाक पि.शेख हसन वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी दोघे रा. हमालकॉलनी किनवट अशांनी मिळुन त्यास मारण्याचा कॉलनीचे शेजारी असलेली विहीरी जवळ बसुन कट रचला होता. त्याचा खुन करण्यासाठी त्याचे मागावर ते घटनेच्या आठ दिवसापुर्वी पासुन मयताचे मागावर होतो असे आरोपीतांनी सांगीतले व दिनांक 14/10/2023 रोजी रोजी रात्रीला सुरेश मस्के याचा खुन केल्याचे सांगतात त्यावरुन वरील तिघांना ताब्यात घेवुन पुढील तपास कामी पो स्टे किनवट यांचे ताव्यात दिले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,अविनाशकुमार अपर पोलीस अधिक्षक, नांदेड,डॉ. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, रामकृष्ण मळघने उप विभागीय पोलीस अधिकारी, किनवट, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड, बी जी कऱ्हाळे, पोलीस निरीक्षक, किनवट यांचे मार्गदशनाखाली दत्तात्रय काळे, पोउपनि, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, चालक शेख कलीम नेमणुक स्थागुशा व पो.स्टे. किनवट येथील सागर झाडे, पोउपनि पोलीस अमलदार गजानन डुकरे, महीला पोलीस अमलदार वर्षा ध्रुर्वे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

238 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.