मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वैरागी साधुसंत महाराजानी सुध्दा जाहिर पाठींबा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली
नांदेड :राज्यात चालू असलेला मराठा आरक्षणा च्या अंतराळी सराटी या गावातून सुरू झालेल्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरुवात केली असून राज्यात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे आणि ठीक ठिकाणी मराठा आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण करण्यात येत असून मोर्चे कॅन्डल मार्च सरकार विरोधी आक्रोश मोर्चे काढून तीव्र असे आंदोलन चालू असून सध्या परिस्थितीत इतर समाजाचेही लोकांनी संघटनांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा देत सकल मराठा समाजासोबत त्यांची साथ असून आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे नांदेड येथे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणासाठी निस्वार्थ भावनेने वैरागी साधुसंत महाराजानी सुध्दा पाठिंबा जाहीर करत अमरण उपोषण
सुरू केले
ह.भ.प.संतोष पुरी महाराज चोळखेकर यांनी मागील ५,६ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असता काल त्यांची तब्येत बिघडली व त्यांना तातडीने भगवती हॉस्पिटल येथे अडमित करण्यात आले डॉ .अंकुश देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ नागेलिकर यांच्या देख रेखित उपचार सुरू आहे आज त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून त्यांची मुलाखत घेतली असता सध्या त्यांना उपोषण सोडन्यासाठी डॉ साहेबांनी सांगितले आहे परंतू त्यांचा ठाम निर्णय आहे की जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही ह्या वरून हे लक्षात येते की त्यांच्या आजवरच्या गाओ गावी फिरत असताना ७०% वर मराठा समाज हा खूप हलाखीचे जीवन जगत आहेत असे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्या मुळे मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा देत आहे आणि देत राहणार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले ह्या वेळी *संत हरिगिर महाराज गाडीपूरा मठ संस्थान*,*संत ज्ञान भारती महाराज देऊळक आदी उपस्थित होते*