किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मराठा आरक्षणासाठी बबन वानखेडे यांच्या पासून राजीनामे सत्राला सुरुवात

किनवट (तालुका प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला आदरणीय अशोक पाटील सूर्यवंशी यांनी मोडकळीस आलेल्या पक्षाला एक उभारी देऊन एक संजीवनी दिलेली होती त्यामुळेच सदर पक्ष हा 2019 मध्ये सत्ताधारी किंबहुना सदर पक्षाचा पुरस्कृत उमेदवार हा विजयी झाला किंबहुना त्याला निसटता विजय म्हणावं लागेल परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न आज रोजी ऐरणीवर असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे हे सत्र जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले तर पक्षाच्या कार्यकर्ता या नात्याने त्याची सर्वच पक्षाला पडझड लागेल किंबहुना सर्व पक्षाना फार मोठा धक्का बसेल असेच होऊ शकते सध्या महाराष्ट्र मध्ये तीन पक्षाचे सरकार असून या तिन्ही पक्ष हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरत असताना वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे पुढाकार केलेला आहे त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडव न्यात यावा जेणेकरून पदाधिकारी हे पदावरच राहतील व संविधानिक लोकशाही जिवंत राहण्यास मदत होईल तसेच सर्वच पक्षप्रमुखांनी मदत करण्याची वेळ आलेली आहे . त्याचाच एक भाग म्हणून बबन वानखेडे यांनी त्यांचा राजीनामा
मा. सुधाकर भोयर,
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तर. यांच्याकडे
मी बबन रामराव वानखेडे मा. भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष किनवट मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक वळणावर असतांना माझे समाजबांधव उद्विग्ण होउन आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलत आहेत. अशा परीस्थितीत मी सक्षमपणे पक्ष कार्यास न्याय देऊ शकत नाही.
मी भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यत्वाचा व शक्तीकेंद्र प्रमुख या जवाबदारीचा राजीनामा देत आहे. तरी आपण माझा राजीनामा स्विकारावा ही नम्र विनंती. असा दिला आहे
यापुढे त्यांनी
समाजापेक्षा पक्षाला व बापा पेक्षा नेत्याला मोठे मानणे हे मला पटणारे नाही… असे ही म्हटले आहे व आमच्या प्रतिनिधी ने त्यांच्याशी संपर्क साधला हे सर्वच पक्षाच्या सत्ताधारी आमदार खासदारांनी करायला हवे पक्षाचा व्हीप मोडून हे ईतर राज्यात जातात मग मराठा आरक्षण साठी पक्षाचा आदेश डावलने
एवढे अवघड आहे काय असे ते म्हणाले..

321 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.