किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कोरोना भारतातून हद्दपार झाल्यामुळे सलग ९०१ दिवसापासून अखंडीतपणे सुरू असलेला मास्क,सैनीटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप करण्याचा ” सेवा ही संघटन ” हा भाजप महानगर नांदेड आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या उपक्रमाचा सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी समारोप*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.2.जिल्यातील करोना सदर्श रुग्ण तपासणी साठी विष्णुपुरी येथील दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना गेली 901 दिवसा पासून अखंडीत पणे सुरु असलेल्या मास्क,सेनिटायजर, बिस्कीट, व पाण्याची बाटल मोफत देणाऱ्या *सेवा ही संघटन* या उपक्रमाचा समारोप आयोजित केला असून शासकीय रुग्णालयातील सफाई कामगारांना छत्र्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे
सोमवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या समारोप प्रसंगी
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे,प्रदेश सचिव देविदास राठोड, मराठवाडा
संघटन मंत्री संजय कौडगे,जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,डॉ.संतुकराव हंबर्डे,सुधाकर भोयर,माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, उत्तर विधानसभा प्रभारी मिलींद देशमुख,लायन्स ग्लोबल सर्विस टीम समन्वयक योगेश जैस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष ॲड.उमेश मेगदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रेरणेने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ही अखंडीत सेवा सुरू आहे.

कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क,सैनीटायझर,बिस्किट व पाण्याची बॉटल देण्यात येते.या उपक्रमाला आतापर्यंत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,तत्कालीन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले.

दररोज साहित्य वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर, प्रभूदास वाडेकर, कामाजी सरोदे,अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा,विलास वाडेकर,सुरेश निलावार,राजेशसिंह ठाकूर, प्रशांत पळसकर, सविता काबरा, सुरेश लोट,महेंद्र शिंदे, विजय वाडेकर,अमोल कुलथिया,सागर जोशी यांनी परिश्रम घेतले आहेत.

संपूर्ण भारतात अशा प्रकारचे सेवा कार्य फक्त नांदेड मध्येच राबविण्यात आले. तरी या समारोप सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक धनेगावकर, व्यंकट मोकले,भाजप उपाध्यक्ष शितल खांडिल,लायन्स सेंट्रल सचिव शिवाजी पाटील,कोषाध्यक्ष सुनील साबू यांनी केले आहे.

109 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.