कै.डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त नांदेड बसस्थानक, स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा संकल्प
नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड : जलनायक डाॅ.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्त आज नांदेड बसस्थानक येथे विश्वासु प्रवासी संघटना नांदेड व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड सामजिक वनीकरण, परमविश्व फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबवला. या जयंती निमत्त विश्वासु प्रवासी संघटना नांदेडचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर विश्वासू प्रवासी संघटनेचे सदस्य तथा स्वच्छता दूत प्रा. डॉ.परमेश्वर पौळ यांच्या संकल्पेनतून नांदेड बसस्थानक, स्वच्छ , सुंदर व हरित करण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन विश्वासु प्रवासी संघटना नांदेड व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभाग याच्या वतीने करण्यात आले होते. आज लावलेल्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी , सर्वांनी घेतली या उपक्रमात सहभाग घेतल्या बदल सर्वाचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी अभिनंदन व कौतुक केले. नांदेड सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी कु.शरयु रुद्रवार यांनी झाडाच्या जातीची निवड व संगोपना बदला मार्गदरशन सूचना दिल्या . या प्रसंगी विश्वासु प्रवासी संघटना नांदेडचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर सामजिक वनीकरनाचे वनपाल अंबादास बेदरकर, आशिष कुरुडे, सोनवणे, विश्वासू प्रवासी संघटनेचे सदस्य तथा स्वच्छता दूत तथा परमविश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ.परमेश्वर पौळ, विश्वासू प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सचिव प्राध्यापक ललिताताई कुंभार, सह कोषाध्यक्ष डॉ. हरदीप सिंघ, सदस्य नियोजन समिती प्रमुख राजकमल सिंघ गाडीवाले, अमरजीत सिंघ कालरा,इजिं.हरजिंदर सिंघ संधू कार्यालयीन प्रमुख,पर्यारणप्रेमींनी, वनरक्षक , वनमजूर यांनी योगदान दिले.