*माजी नगरसेविका गंगाबाई कदम यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२३.महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायणराव कदम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मंगेश कदम मित्रमंडळाच्यावतीने 24 जानेवारी रोजी तरोडा (बू) महसूलनगर येथे अकरा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सामाजिक कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन अँड धम्मपाल कदम यांनी केले आहे.
शहरातील तरोडा (बू) येथील माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायण कदम यांचे गेल्यावर्षी 24 जानेवारी रोजी निधन झाले होते. गंगाबाई कदम यांनी तरोडा भागाचे दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य, महानगर पालिकेचे दोन वेळेस नगरसेविका पद भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात तरोडा भागातील विकास मोठया जोमाने झाला आहे.
या विकास कामात त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते महिलावर्गात लोकप्रिय होत्या.गंगाबाई कदम यांचे निधन होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने कदम परिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवित गंगाबाई कदम यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबीर, बुद्ध पूजापाठ,चिवरदान व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्त संध्याकाळी प्रा.अविनाश नाईक यांच्या मिशन -ए – भिमक्रांती हा बुद्ध -भिम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन अँड धम्मपाल कदम यांनी केले आहे.
मंगेश मित्र मंडळाच्यावतीने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.अशी माहिती अँड. धम्मपाल कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.