किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार व मंत्र्यावर कठोर कारवाई करा…सीटूजमसं,एसएफआय व डीवायएफआय चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.18.राष्ट्रीय व आंरराष्ट्रीय महिला कुस्तीरांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंग व हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि.१८ मे रोजी अनेक संघटणांच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली.त्याचाच भाग म्हणून सीटू, जमसं,एसएफआय व डीवायएफच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.निदर्शने झाल्यानंतर उपरोक्त चार संघटनाचे संयुक्त निवेदन देशाच्या महामाहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्फत पाठविण्यात आले.दि.२३ एप्रिल पासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे राष्ट्रीय महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत म्हणून आंदोलन सुरु आहे.

भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंग आणि हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांनी कुस्तीगीर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
पीडित महिला खेळाडू मागील २३ मे पासून आंदोलन करीत आहेत.शोषण झालेली एक खेळाडू मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत अनेक अराजकीय व वर्गीय संघटणांनी देशभर आंदोलने पुकारली आहेत.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर देखील तीव्र निदर्शने करण्यात आली.केंद्र आणि राज्य सरकाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत संबंधित खासदार आणि मंत्र्यावर कारवाई करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सीटू च्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून तीव्र शब्दात टीका केली.
जमसंच्या वतीने कॉ.करवंदा गायकवाड व कॉ.लता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.डीवायएफआयच्या वतीने कॉ.श्याम सरोदे तर एसएफआयच्या वतीने मीना आरसे व पवन जगदमवाड यांनी विचार मांडले.
आभार कॉ.जयराज गायकवाड यांनी मानले तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.मारोती केंद्रे, कॉ.गंगाधर मेडकर,कॉ.सोनाजी कांबळे, कॉ. बालाजी पाटील भोसले, कॉ. गंगाधर खुणे, कॉ.केशव सरोदे,अनुराधा लेंडाळे,कॉ.बालाजी सरोदे, कॉ. रावसाहेब मेटकर आदींनी प्रयत्न केले.कॉ.गंगाधर गायकवाड
जनरल सेक्रेटरी – CITU नांदेड जिल्हा कमिटी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

168 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.